प्रजासत्ताक दिनी कोल्हापुरातील दसरा चौकात धडाडणार वक्ते जगदीश ओहोळ यांची तोफ; संविधानाच्या अमृत महोत्सव अभियानचा होणार प्रारंभ
पुणे(प्रतिनिधी) ; कोल्हापुरातील सर्व संविधान प्रेमी व संविधान समर्थक जनतेच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सव अभियानाची सुरुवात 26 जानेवारी 2025 म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून होत आहे त्यानिमित्त प्रजासत्ताक दिनी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व जग बदलणारा बापमाणस पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापुरातील बिंदू चौक ते दसरा चौक भव्य संविधान प्रबोध यात्रा निघणार आहे त्यानंतर दसरा चौकामध्ये व्याख्यान संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय अमोल एडगे साहेब हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती मालोजीराजे ( माजी आमदार) हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे व अधिष्ठाता सत्यवान मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
काॅफीमुक्त परिक्षेसाठी बोर्डाचा आता नवा पॅटर्न;पॅटर्न मुळे काॅफिला बसणार आळा
तरी या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संविधान प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय संविधान अमृतमहोत्सव कृती समिती कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.