माढासोलापूर जिल्हा

प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने उंदरगावामध्ये बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे टोकण वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने उंदरगावामध्ये बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे टोकण वाटप

माढा प्रतिनिधी – प्रहार चे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चू भाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने उंदरगावामध्ये बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे टोकन वाटप शिबिर घेण्यात आले. त्या शिबिरामध्ये 445 कामगारांना गृह उपयोगी संचाचे वाटप करण्यात आले. सोलापूर मध्ये कामगारांना जाऊन प्रचंड गर्दीच्या कारणाने गृह उपयोगी संच घेणे शक्य नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने माढा तालुक्यातील 445 लाभार्थ्यांना टोकण चे वाटप करण्यात आले.

या शिबिरामधील लाभार्थ्यांना येणाऱ्या पुढील आठवड्यात उंदरगावामध्ये प्रत्यक्ष गृह उपयोगी संचाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे आणि तालुका उपाध्यक्ष भास्कर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख उपस्थिती म्हणून अमोल तांबीले सर होते. शिबिरात महिलांचा विशेष सहभाग दिसून आला. सदर शिबिर हे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा – करमाळा येथे स्व.लिलाताई दिवेकर स्मृतीदिनानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न; क्लिक करून वाचा यशस्वी विद्यार्थ्यांची नावे

32 वर्षानंतर उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांनी अनुभवली आपली शाळा

हे शिबीर शिबिर पार पाडण्यासाठी संतोष कोळी, रविकांत कोळेकर, युवराज तांबीले, आबासाहेब कोळेकर, विष्णू सुतार, महेश आरे, यश चव्हाण, संतोष माने, नितीन रंगा चव्हाण, किरण लवटे, सागर चव्हाण, प्रशांत चव्हाण, धीरज भांगे, पोपट घुले ,विशाल मुजमुले, जयंत मोटे यांचे सह अनेक प्रहार कार्यकर्त्यांनी मेहनत घेत काटेकोर नियोजन करत शिबिर पार पाडले.

litsbros