प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने शेतकऱ्यांच्या ‘ या ‘ मागणीसाठी माढा तहसीलदारांना निवेदन;अन्यथा आंदोलनाचा इशारा

प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने शेतकऱ्यांच्या ‘ या ‘ मागणीसाठी माढा तहसीलदारांना निवेदन;अन्यथा आंदोलनाचा इशारा

माढा प्रतिनिधी
माढा तालुक्यात पावसाळा सुरू होऊन देखील एक महिना उलटून गेला असला तरी अद्याप पर्यंत पाऊस पडलेला नाही तसेच पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे सिना नदी देखील मे महिन्याच्या अगोदरच कोरडी पडलेली आहे.

त्यामुळे तालुक्यातील इतर भागातील तसेच सिना नदी काठाचे शेती पिके त्यात महत्त्वाचे ऊस तीव्र उन्हामुळे पूर्णपणे जळून गेलेली आहेत. तसेच तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे.

त्यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व लहान मुलांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे त्वरित पाण्याच्या सोईसाठी टँकर चालू करावेत. आणि जळालेल्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी अन्यथा येत्या काळात प्रहार शेतकरी संघटना आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल.

हेही वाचा – मानेगाव येथे नीट परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल संस्कृती मोटे व दिपक गावडे यांचा

मृग नक्षत्र कोरडे चालल्याने खरीप हंगाम धोक्यात: करमाळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल, वाचा सविस्तर

या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जी पाटील, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, तालुका विद्यार्थी उपाध्यक्ष संतोष कोळी, आबासाहेब कोळेकर, नितीन चव्हाण प्रशांत चव्हाण उपस्थित होते.

karmalamadhanews24: