प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने अपंगाला तीन चाकी सायकल वाटप
माढा प्रतिनिधी – प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने अपंगाला तीन चाकी सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महावीर भैया धोका यांच्या माध्यमातून रमनलाल पोरवाल ट्रस्ट पुणे यांच्या सौजन्याने प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांच्या प्रयत्नातून जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी वाजता उंदरगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
मा. बच्चू भाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होत त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने नेहमीच समाज उपयोगी कामे मार्गी लावण्याचे काम होत आहे. माने गावचे लाडके नेते अनिल नाना भेंडकर , मुकुंद तांबीले गुरुजी आणि मानेगाव चे माजी उपसरपंच प्रमोद भेंडकर यांच्या हस्ते दारफळ गावचे महेश धनाजी बारबोले, बुद्रुक वाडीचे बाबासाहेब केशव चव्हाण तसेच तांदूळ वाडीगावचे संगीता संभाजी गवळी या अपंगाना सायकल वाटप करण्यात आले. येणाऱ्या ऑक्टोंबर मध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने माढा तालुक्यात विविध अपंगाना न्याय देण्याच्या भूमिकेतून अपंगाना विविध वस्तूंच्या वाटपाबाबत एक मोठे शिबिराचे आयोजन करन्यात येणार असल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके यांचे कडून सांगण्यात आले.
कटला जातीचे दोन मासे देऊन केला मच्छीमार बांधवांनी आमदार भरणे यांचा केला आगळावेगळा सत्कार
यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, बिरूदेव शेळके, राजाभाऊ शिंदे, संतोष कोळी, आलम जमादार, रमेश तांबीले, गणेश चव्हाण, प्रशांत देशमुख, बाळासाहेब साळुंके,आबासाहेब कोळेकर, अमोल काळोखे, रवी मस्के, युवराज तांबीले, किरण लवटे, अतुल थोरात, तानाजी मोटे, गणेश नाईकवाडे, हिदायत आवटे, स्वप्नील चव्हाण, गणेश सुतार , पांडुरंग तांबीले, यांचे सह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.