करमाळासोलापूर जिल्हा

प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समिती येथे दिव्यांगाना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्राचे झाले वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समिती येथे दिव्यांगाना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्राचे झाले वाटप

करमाळा(प्रतिनिधी); आज करमाळा येथे आमचे नेते अपंगांचे दैवत वंदनीय माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या विचाराने व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित दिव्यांग बांधवांना ऑनलाइन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

प्रहार संघटनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रत्येक गोरगरीब, वंचित लोक,व शेतकरी वर्ग ,दिव्याग बांधव, विधवा महिला, धारकांसाठी करमाळा तालुक्यामध्ये समाज उपयोगी, रुग्णसेवा, कार्यक्रम रक्तदान समाजसेवा करण्याचे काम करतात.

प्रहार संघटना वंचित लोकांना न्याय मिळवून देते. पंचवीस वर्षाच्या कारकीर्द संघर्ष करून वंदनीय बच्चुभाऊ कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी 32 शासन निर्णय काढले आहेत स्वतः भाऊंनी 110 वेळा रक्तदान करून गिनीज बुक रेकॉर्ड नोंद केली आहे. स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालय सध्याच्या या सरकारमध्ये स्थापन झाले आहे. पूर्ण महाराष्ट्र मध्ये या निर्णयाचा जल्लोष होतआहे. असल्यामुळे यांचे आभार मानले जात आहेत.

सेवा, त्याग, संघर्ष, या विचार प्रणालीने प्रहार संघटनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात मध्ये आनेक दिव्यांग बांधवांना व विधवा महिलांना गोरगरीब शेतकरी वर्ग यांना न्याय मिळवून देण्याचे काम निस्वार्थ पणे प्रहार संघटनेच्या माध्यमातून होत आहे.

सध्या करमाळा तालुक्यामध्ये जे दिव्याग बांधव यांच्याकडे ऑनलाइन प्रमाणपत्र नाही व प्रमाणपत्र असून त्यांना सरकारी सुविधांचा लाभ मिळत नाही. अशा दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांना प्रमाणपत्र व सरकारी सुविधांचा लाभ मिळवून दिला जाईल. अशा दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळवावे.

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील व सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी,यांच्या नेतृत्वाखाली आज करमाळा तालुक्यामध्ये पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत साहेब यांच्या हस्ते 1) सुमन जालिंदर गायकवाड( शेलगाव वांगी) 2,)दादा पदरी पोळ, (शेलगाव वांगी), 3)स्वाती महादेव कोळी (शेलगाव वांगी) , 4,)रोहित दशरथ जाधव ( जेऊर) या दिव्यांग बांधवांना,ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

व यांनी आश्वासन दिले आहे की करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये दिव्याग बांधवांना स्वतःच्या हक्काचे प्रत्येक वर्षी प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के अपंग निधी व पेन्शन योजना, प्रत्येक सरकारी शासनाचे सुविधा मिळवण्यासाठी मी कटीबद्ध आहे. असे आश्वासन दिले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मान्यत आले.

हेही वाचा – पोटातल्या बाळासह पत्नीचा मृत्यू, पतीनेही विषारी औषध घेऊन संपवले जीवन

सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्यावर झाले ‘गेट बंद’ आंदोलन; आरोग्यमंत्री सावंत यांनी ऊसदर कोंडी फोडावी अशी मागणी

त्यावेळी उपस्थित प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष संजय भाऊ पवळ, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र काढून देण्याचे काम करतात. त्याबद्दल त्यांचे स्वागत म्हणून करमाळा तालुक्याचे उपसभापती दत्ता काका सरडे , करमाळा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव नेरले गावचे माजी सरपंच औदंबरराजे भोसले व अनेक पक्षाचे अध्यक्ष नेते व प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे कौतुक करून मनःपूर्व आभार मानले. त्यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here