ताज्या घडामोडी

अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

 सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

आपल्या अभिनयानं त्यानी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी सिनेसृष्टीत मानानं आणि अभिमानानं मिरवावं असं व्यक्तीमत्व. त्याचं नाव सिनेसृष्टीत आदरानं घेतलं जातं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अश्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या मोरूची मावशी या नाटकाने तर मराठी सिनेरसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

प्रदीप पवर्धन यांचे गाजलेले सिनेमे

एक फुल चार हाफ

डान्सपार्टी

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

गोळा बेरीज

बॉम्बे वेल्वेट

पोलीस लाईन

1234

एक शोध

थॅक्यू विठ्ठला

चिरनेर

litsbros

Comment here