पोथरे शाळेत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दिमाखात संपन्न
करमाळा प्रतिनिधी
आज प्रजासत्ताक दिनाचा अमृतमहोत्सवी सोहळा जिल्हा परिषद केंद्रशाळा पोथरे येथे दिमाखात संपन्न झाला . यावेळी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, मान्यवर पालक बांधव आणि युवा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते .
शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत भैय्या शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर विद्यार्थ्यांची सामुदायिक कवायत घेण्यात आली .
उपशिक्षक श्री .बापूराव रोकडे सर यांनी सर्व उपस्थितांना कुष्ठरोग निर्मूलनसाठी शपथ देऊन कुष्ठरोग विषयक सामाजिक जनजागृती केली .
आजचा हा सोहळा अमृतमहोत्सवी सोहळा असल्याने शासनाच्या परिपत्रकानुसार ‘हर घर संविधान’ उपक्रमाच्या अनुषंगाने इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी संविधानाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी व त्याचे महत्व प्रत्येक नागरिकाला पटवून देण्यासाठी एक प्रभावी ‘पथनाट्य’ सादर करून उपस्थितांची मने जिंकली . तर विद्यार्थ्यांची भाषणे, आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली .
कु .आदिती पाडुळे या विद्यार्थीनीने आपल्या कथाकथनातून हृदय हेलावून टाकणारी बळीराजाची व्यथा मांडली त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली . मान्यवरांनी सर्व उपक्रमांना बक्षीस देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले .
हेही वाचा – काॅफीमुक्त परिक्षेसाठी बोर्डाचा आता नवा पॅटर्न;पॅटर्न मुळे काॅफिला बसणार आळा
उंदरगाव येथील भूमिपुत्रांचा सन्मान संपन्न
यावेळी शाळेत घेतल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये व टॅलेंट हंट स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने आकर्षक बक्षीसे देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला .
शा .व्य. समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत पोथरे व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री .गजेंद्र गुरव सर यांनी केले . सूत्रसंचालन श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी (शेख) यांनी तर फलकलेखन श्रीम.सविता शिरसकर यांनी केले.
सोहळा यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका श्रीम.शाबिरा मिर्झा, श्रीम. स्वाती गानबोटे यांनी परिश्रम घेतले तर आभारप्रदर्शन श्री.लहू जाधव सर यांनी केले .