राजकारणसोलापूर जिल्हा

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

धनगर समाजाचे आक्रमक नेते व भाजपचे विधानपरिषद सदस्य आ.गोपीचंद पडळकर रोज नवनव्या गोष्टींनी चर्चेत असतात. पण आज मात्र त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. 

सोलापूर मड्डी वस्ती परिसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सायंकाळी ८ वाजता समाजकंटकांकडून दगडफेक झाल्याचे कळते. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.

पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर घोंगडी बैठकीसाठी आले होते. सकाळी सोलापूरात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टिका केली होती यातुनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, जिल्ह्यातील भाजप कार्येकर्ते पडळकर यांना भेटायला येत असल्याने गर्दी होत आहे.

litsbros

Comment here