महाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या ‘ या’ बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी; राजकीय वर्तुळात खळबळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या ‘ या’ बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी; राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यातील सत्तांतरानंतरची सर्वात मोठी बातमी आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ईडीन आणि आयकर विभागाने एकत्रितरित्या पहिली कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहेत. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून कोल्हापुरातही खळबळ उडाली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी ईडी आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. ईडी आणि आयकर विभागाचे 20 अधिकारी आज पहाटे 6.30 वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. या सर्वांनी सकाळपासूनच मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. तसेच घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अजूनही आयकर विभाग आणि ईडीची तपासणी सुरू आहे. घरातील कुणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच बाहेरच्यांना आत येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यामुळेच मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.

एखाद्या बड्या नेत्याच्या घरी आयकर विभाग आणि ईडीने छापेमारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीनंतर मुश्रफ समर्थकांनी मुश्रफ यांच्या घराबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

litsbros

Comment here