मुंबईराजकारण

एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

एकनाथ शिंदे थोड्याच वेळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचं ‘राजकारण’ केल्यामुळं शिवसेनेच्या गटात खळबळ उडाली आहे. शिंदे त्यांच्या जवळपास ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेचा बंड करुन गुवाहाटीत वास्तव्यास आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आमदारांना भावनिक आवाहन केले. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील 21 आमदार अजूनही आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

तसंच आमदारांनी 24 तासांच्या आत मुंबईत यावं, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू असा प्रस्तावही त्यांनी ठेवला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या प्रस्तावावर मोठी प्रतिक्रिया दिलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या प्रस्तावावर विचार करण्याची वेळ निघून गेलीय. शिवसेनेचे  ४० हून अधिक आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावा शिंदे यांनी केला आहे. तसंच पुढच्या काही वेळात बैठक घेऊन यावर आमदारांशी बोलून निर्णय घेणार. राऊत यांच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे थोड्याच वेळात व्हिडिओ प्रतिक्रिया देणार असल्याचं समजते.

litsbros

Comment here