मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ‘ या ‘ बड्या नेत्याला जिवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ‘ या ‘ बड्या नेत्याला जिवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे . यादरम्यान अजित पवारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

एका अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा फोनवरून केला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली असून घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. 

पुण्यात दौऱ्यावर असताना रात्री साडे अकराच्या सुमारास धमकीचा फोन आला. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line