करमाळा

ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी प्रशासन कालावधीत पोलीस पाटलांची नियुक्ती करा- प्रताप पाटील

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी प्रशासन कालावधीत पोलीस पाटलांची नियुक्ती करा-प्रताप पाटील

 

करमाळा माढा न्यूज : महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया होणार असून प्रशासन कालावधीत प्रशासक म्हणून पोलीस पाटील यांना प्राधान्य द्यावे अशी मागणी करमाळा तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील यांनी केली.यावेळी खजिनदार राहुल सुतार कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ शिरसागर मार्गदर्शक बापू शिरगिरे उपस्थित होते.


सध्या कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुका पुढे करण्याचे ठरले आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया होणार आहेत यासाठी जिल्ह्यातून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती होण्यासाठी बऱ्याच जणांची मोर्चेबांधणी चालू आहे. प्रशासन काळात स्थानिक नियुक्ती केल्यास त्याला गावातून विरोध होऊ शकतो हा नको तो नको हा पाहिजे याच्यातून गावात तंटे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

👉  जिल्हा कारागृहातील कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनास आले यश; बंदी आणि कर्मचारी झाले कोरोना मुक्त

शिवाय कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेले कामकाज करण्यात प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी महत्त्वाची भूमिका निभावून जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोना बाबत ग्रामस्थ व प्रशासन यांच्यात चांगला समन्वय ठेवत आहे कोरोना या आजाराचे संकट कायम असल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासन कालावधीत प्रशासक पदी पोलीस पाटलाची नियुक्ती केल्यास कामात पारदर्शकपणा येऊ शकतो.

हेही वाचा-परीक्षा रद्द कराल तर खबरदार, कारवाईला सामोरे जावे लागेल; राज्यसरकार ला ‘यांनी’ दिला इशारा

वरील सर्व बाबीचा विचार करून शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासन कालावधीत प्रशासक म्हणून प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांची नियुक्ती करावी अशी मागणी तालुकाध्यक्ष प्रताप पाटील हे शासनाकडे करणार आहेत.

“पोलिस पाटील” या पदासाठी दहावी शिक्षणाची अट आहे तसेच ते उच्च शिक्षित सुद्धा आहेत ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटील यांना प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यास गावचा कारभार हा सुशिक्षित व्यक्तीच्या हातात जाऊंन विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडेल. तसेच पोलीस पाटील हा प्रशासनाचा एक भाग असल्याने तो चोख व पारदर्शी कारभार करेल –

विजय निकत पाटील ,सचिव करमाळा तालुका पोलीस पाटील संघटना

 

litsbros

Comment here