ताज्या घडामोडीपुणे

म्हणून ते तीन पोलीस अंमलदार केले तडकाफडकी निलंबित

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

म्हणून ते तीन पोलीस अंमलदार केले तडकाफडकी निलंबित

पुणे :  पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यातील तपास पथकाचा कार्यालयातून अटक केलेला आरोपी पळून गेल्या प्रकरणी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी वारजे पोलीस ठाण्यातील तिघा कर्मचार्‍यांना निलंबित (Pune Police) केले आहे.
पोलीस हवालदार संभाजी गायकवाड (Police Havaldar Sambhaji Gaikwad), पोलीस नाईक महेश धोत्रे
(Police Naik Mahesh Dhotre) आणि पोलीस शिपाई विशाल कदम (Police Vishal Kadam) अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत.

वारजे येथील एका ४ वर्षाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन एका २८ वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली होती.

त्यानंतर त्याला या तिघांच्या देखरेखीखाली तपास पथकात ठेवण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर सर्व जण झोपल्यावर आरोपी १८ सप्टेंबर रोजी वारजे पोलीस ठाण्यातून (Warje Police Station) पळून गेला. हा प्रकार सकाळी ६ वाजता पोलिसांच्या लक्षात आला.
त्यानंतर एकच गडबड उडाली होती. बरीच शोधाशोध केल्यानंतर हा आरोपी एका दारूच्या गुत्यावर आढळून आला होता.

हेही वाचा-महाराष्ट्रातील सर्व मंदिरे ‘या’ तारखेपासून उघडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

भोंदूबाबा मनोहर भोसलेला ‘या’ कारणामुळे करमाळा तुरुंगातून आज नेले सोलापूरला

मात्र, तोपर्यंत आरोपी पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांनी त्याची दखल घेऊन तिघांना निलंबित केले आहे. एकाचवेळी 3 पोलीस अंमलदार निलंबित झाल्याने पुणे शहर (Pune Police) पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

litsbros

Comment here