पोफळज (ता.करमाळा) पर्यावरणपूरक आकाश कंदील किल्ला व पणती रंगवून व शुभेच्छा कार्ड तयार करून दिवाळीचे स्वागत. विद्यार्थ्यांनी केला फटाके मुक्त उत्सवाचा साजरा करण्याचा संकल्प.

पोफळज (ता.करमाळा) पर्यावरणपूरक आकाश कंदील किल्ला व पणती रंगवून व शुभेच्छा कार्ड तयार करून दिवाळीचे स्वागत.

विद्यार्थ्यांनी केला फटाके मुक्त उत्सवाचा साजरा करण्याचा संकल्प.

केत्तूर ( अभय माने) पोफळज (ता.करमाळा) येथील जि.प.शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने दिवाळी सणाचे स्वागत केले.आपल्या भारतीय परंपरेत सण आणि उत्सव यांचे महत्व अनन्यसाधारण असून निसर्ग, पर्यावरण संवर्धन होण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत पर्यावरणस्नेही सण उत्सव साजरे करावेत असे शिक्षक निलेश जाधवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

माणसा एवढाच पशू,पक्षी यांच्यासह अन्य जीवांचाही जगण्याचा हक्क मान्य करायला हवा.दिवाळीमध्ये माणसांसह प्राणी व पक्षी यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन शिक्षक जहांगीर सय्यद यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा केली.
टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना राबवून प्लॅस्टीकचा वापर टाळत उपलब्ध साधनांच्या सहाय्याने,नानारंगी वेगवेगळ्या आकारांचे आकर्षक आकाश कंदील तयार केले.
तर मुलांनी महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्यांची प्रतिकृती तयार केली.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका मुमताज फकीर, उपक्रमशील शिक्षिका रेखा शिंदे-साळुंके,शुभांगी शिंदे,उत्कृष्ट फलक लेखन करणारे शिक्षक निलेश जाधवर,जहांगीर सय्यद यांनी मार्गदर्शन केले.

गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, विस्तार अधिकारी निलेश कदम,केंद्र प्रमुख वंदना पांडव शाळा व्यवस्थापन समिती पोफळज,सरपंच कल्याण बापू पवार,उपसरपंच राणी गव्हाणे, मा.सरपंच दत्तात्रय गव्हाणे,पोफळज ग्रामस्थ व पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ळज येथील जि.प.शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने दिवाळी सणाचे स्वागत केले.
आपल्या भारतीय परंपरेत सण आणि उत्सव यांचे महत्व अनन्यसाधारण असून निसर्ग,पर्यावरण संवर्धन होण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत पर्यावरणस्नेही सण उत्सव साजरे करावेत असे निलेश जाधवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

माणसा एवढाच पशू,पक्षी यांच्यासह अन्य जीवांचाही जगण्याचा हक्क मान्य करायला हवा.दिवाळीमध्ये माणसांसह प्राणी व पक्षी यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन जहांगीर सय्यद यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा केली.
टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना राबवून प्लॅस्टीकचा वापर टाळत उपलब्ध साधनांच्या सहाय्याने, नानारंगी वेगवेगळ्या आकारांचे आकर्षक आकाश कंदील तयार केले.
तर मुलांनी महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्यांची प्रतिकृती तयार केली.

हेही वाचा – महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी

प्रवासी सेवा संघाकडून विविध मागण्यांचे निवेदन:नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासह इतर मागण्या

या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका मुमताज फकीर, उपक्रमशील शिक्षिका रेखा शिंदे-साळुंके, शुभांगी शिंदे, उत्कृष्ट फलक लेखन करणारे शिक्षक निलेश जाधवर, जहांगीर सय्यद यांनी मार्गदर्शन केले.

गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे,विस्तार अधिकारी निलेश कदम,केंद्र प्रमुख वंदना पांडव शाळा व्यवस्थापन समिती पोफळज,सरपंच कल्याण बापू पवार,उपसरपंच राणी गव्हाणे, मा.सरपंच दत्तात्रय गव्हाणे,पोफळज ग्रामस्थ व पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

karmalamadhanews24: