मेघश्री गुंड हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड विठ्ठलवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खेळाडू

मेघश्री गुंड हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

विठ्ठलवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खेळाडू

माढा /प्रतिनिधी-जिल्हा परिषद शिक्षण विभाग व कुर्डूवाडी पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 19 डिसेंबर 2024 रोजी टेंभुर्णी येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर माढा तालुक्यतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी येथील इयत्ता सातवीतील खेळाडू मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

मेघश्री गुंड हिने चमकदार कामगिरीच्या जोरावर अनुक्रमे केंद्रस्तरीय,बीटस्तरीय व तालुकास्तरीय या तीनही ठिकाणच्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशामुळे तिने शाळेचा,कुटुंबाचा व गावाचा नावलौकिक जिल्ह्यात उंचावला आहे.तिला सहशिक्षिका सुप्रिया ताकभाते,आई मेघना गुंड, मुख्याध्यापक सुभाष लोखंडे, गोरखनाथ शेगर,संजय सोनवणे,भारत कदम,ऐजिनाथ उबाळे,तानाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.मेघश्री गुंड ही विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांची कन्या आहे.

हेही वाचा – जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान

विठ्ठलवाडीचे राजेंद्र गुंड जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित

या यशाबद्दल तिला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव व केंद्रप्रमुख फिरोज मनेरी यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी विस्ताराधिकारी शोभा लोंढे, डायटचे समन्वयक सुहास राऊत,विष्णू बोबडे,सुधीर गुंड, प्रकाश सुरवसे यांच्यासह शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

फोटो ओळी- विठ्ठलवाडी ता. माढा येथील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली मेघश्री गुंड हिस गोल्डमेडल व प्रमाणपत्र देताना गटशिक्षणाधिकारी विकास यादव,सुधीर गुंड व इतर मान्यवर.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line