भरपूर पाऊस पडू दे,शेतकरी सुखी समाधानी राहू दे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाकडे साकडं!
नाशिक जिल्ह्यातील ‘या’ दापत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान
पंढरपूर प्रतिनिधी –
महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या संत संप्रदायाची शिकवण आणि मानवा-मानवांतील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत झिरपलेल्या भक्तीरसाचा हा सांस्कृतिक वारसा आहे.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात भक्तीचा महासागर उसळला आहे.या भक्तीमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठुरायाची महापूजा केली.
यावेळी विठोबा राज्यात चांगला पाऊस पडू दे,शेतकऱ्याला सुखी समाधी राहू दे. असे विठुरायांकडे साकडे घातले. आषाढी एकादशीचा निमित्त यंदा विठ्ठल रुक्माई च्या शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला.त्यांच्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील शंकर अहिरे व आशा बाळू आहिरे या वारकरी दापत्याला शासकीय पूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. अहिरे धापत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी आहेत.हे दापत्या ते गेल्या सोळा वर्षापासून अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत आहेत.
हेही वाचा – श्री किर्तेश्वर भगवंताची पालखी पंढरपूर येथे दाखल
अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायतीच्या वतीने 1000 वृक्ष लागवडीचा शुभारंभ
अडीच वाजलेल्यापासून या शासकीयला पूजेला सुरुवात झाली होती.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,आरोग्य मंत्री तानाजी सावंत,आमदार समाधान अवताडे यांच्यासह अनेक मंत्री खासदार उपस्थित होते.