मातृ शक्तीचा सन्मान करणे कर्तृत्वाची भरारी घेण्यास प्रेरणादायी – नारी शक्ती गौरव पुरस्कार प्रदान सोहळयात प्रा. करे-पाटील यांचे प्रतिपादन

मातृ शक्तीचा सन्मान करणे कर्तृत्वाची भरारी घेण्यास प्रेरणादायी –
नारी शक्ती गौरव पुरस्कार प्रदान सोहळयात प्रा. करे-पाटील यांचे प्रतिपादन

केत्तूर (अभय माने) प्रिसिजन उद्योग समूहाच्या डॉ सुहासिनी शहा, प्रोलक्स अँण्ड वेलनेसच्या डॉ.प्रचिती पुंडे , यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, विनय गृपचे चंद्रशेखर अक्कलकोटे दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन फलटणकर, युनिट हेड नौशाद शेख या प्रमुख मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सोलापूर जिल्हयातील विविध क्षेत्रात समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या स्त्रियांना दै. भास्कर माध्यम समूहाचा दिव्य मराठी नारी शक्ती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दिव्य मराठी व विनय गृप यांचे संयुक्त विद्यमाने नारी शक्ती गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यांचा झाला सन्मान.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या करमाळ्याच्या डॉ.सुनिता देवी, प्रा.रेखा शिंदे -साळुंके, डॉ. सरिता विटुकडे, प्रा. ज्योती मुथ्था यांचा सोलापूर येथे नारी शक्ती गौरव 2024 पुरस्काराने सन्मान करण्यात आला

प्रमूख पाहुणे व यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करुन दिव्य मराठी समूहाचे आभार व्यक्त केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की,
मातृ शक्तीचा सन्मान करणे म्हणजे महिलांना कर्तृत्वाची भरारी घेण्यास प्रेरणा देणे होय
नुकतेच नवरात्री साजरी झाली, कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली मात्र यशाची पौर्णिमा साजरी व्हावी या हेतूने दिव्य मराठीने नारी शक्तीचा सन्मान करून महिलांना सहावे सुख देण्याचे कार्य केले आहे. आपली संस्कृती मातृशक्तीचा आदर करणारी असून समाजाच्या उत्थानासाठी सर्जनशील विचारांची गरज असून विविध क्षेत्रे आजमावून पाहणारी नारी शक्ती हीच समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करत आहे हे विशेष महत्वाचे असून या कार्याची दखल घेत दिव्य मराठीने नारी शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित केला हे विशेष कौतुकास्पद आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.


समारंभास उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. प्रचिती पुंडे यांनी महिलांचे कृती सत्र घेऊन मार्गदर्शन केले. डॉ. पुंडे म्हणाल्या की, सकारात्मकतेवर भर देत महिलांनी स्वतःला दूषण देणे थांबवावे. स्त्री स्वातंत्र्याचा निखळ आनंद अनुभवावा. निरोगी जीवनशैलीने मानसिक व शारीरिक स्वास्थ जपण्याचा प्रयत्न करावा, आपणच अष्टभूजा आहोत त्यामुळे स्त्री असण्याचा आनंद साजरा केल्यास स्त्री शक्तीचा अविष्कार निश्चित होईल असे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. सुहासिनी शहा मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, महिला नोकरी करणारी असो की गृहीणी ती कणखरच असते. महिलांमध्ये सहनशीलतेसह अनेक गुण असतात त्यांचा अविष्कार व्हायला हवा.महिला आपले कार्य सचोटीनेच करत असते. आता तिने अर्धे आकाश व्यापले असे म्हटले जाते परंतू एवढयावरच न थांबता तिने जेवढे मिळेल तेवढे कार्याचे आकाश व्यापून टाकावे असे मत व्यक्त केले.

दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन फलटणकर व युनिट हेड नौशाद शेख यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील , प्रिसीजन उदयोग समुहाच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. सुहासिनी शहा, प्रोलक्स वेलनेसच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. प्रचिती पुंडे, विनय गृपचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर अक्कलकोटे, या प्रमुख मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

हेही वाचा – कामे न करता फक्त पैसा व मनोरंजनाच्या जोरावर आमदार होता येते हा विरोधकांचा गैरसमज – आ. बबनदादा शिंदे वडाचीवाडी (अं.उ) येथे शेतकरी मेळावा व वचनपूर्ती सोहळा संपन्न

चैतन्य महेश कुलकर्णी चा डिजीटल मार्केटिंग एक्सलन्स आवार्डने पुणे येथे सन्मान

वैद्यकीय सेवा, विधी सेवा, बँकींग व फायनान्स, सरकारी सेवा,प्रसारमाध्यम,
व्यवसाय, सहकार, शैक्षणिक,सामाजिक, कला व क्रिडा अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दुर्गांचा नवरात्री उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पुरस्कार प्राप्त डॉ. सुनिता देवी, डॉ. सरिता विटूकडे, प्रा. रेखा शिंदे-साळुंके, प्रा. ज्योती मुथ्था यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

karmalamadhanews24: