पर्यटन विभागाच्या निधीतून कमलाभवानी देवस्थानची 1 कोटींची कामे पूर्ण; 3 कोटी निधीची ‘ही’ कामे प्रगतीपथावर

पर्यटन विभागाच्या निधीतून कमलाभवानी देवस्थानची 1 कोटींची कामे पूर्ण; 3 कोटी निधीची ‘ही’ कामे प्रगतीपथावर

करमाळा (प्रतिनिधी);
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये श्री कमलाभवानी देवस्थानच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून आपण 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतलेला होता.

त्या निधीमधून पेविंग ब्लॉक बसविणे व रस्ते सिमेंट काँक्रीट करणे अशी 1कोटी रुपये निधी मंजूर असलेली कामे पूर्ण झाली असून मंदिर परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे, भक्तनिवास बांधणे वॉल कंपाऊंड बांधणे ,स्ट्रीट लाईट बसवणे ,महिला व पुरुष यांच्यासाठी स्वच्छतागृह बांधणे आदी 3 कोटी रुपये निधी मंजूर असलेली कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, श्री.कमलाभवानी हे करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आहे .

हे देवस्थान करमाळा शहराच्या लगत असून या देवस्थानचा विकास करण्यासाठी 4 कोटी रुपये निधी आपण मंजूर केला होता. त्या निधीमधून पेविंग ब्लॉक बसविणे – 24 लाख, सर्व रस्ते सिमेंट काँक्रीट करणे – 76 लाख, रस्ते डांबरीकरण करणे – 47 लाख ,

भक्तनिवास बांधणे – 80 लाख ,महिला व पुरुषांच्या साठी स्वच्छतागृह बांधणे – 21 लाख 50 हजार ,वॉल कंपाऊंड बांधणे -1 कोटी 43 लाख, स्ट्रीट लाईट बसविणे -15 लाख असा निधी मंजूर होता. या निधीमधून पेविंग ब्लॉक व सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून बाकी सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.

देवीच्या माळचा चेहरा मोहरा बदलला – श्री महेश सरोटे (सरपंच, देवीचामाळ.)
आ. संजयमामा शिंदे यांनी 4 कोटी रुपयांचा जो विकास निधी देवीचामाळ येथील श्री कमलाभवानी देवस्थानच्या विकासासाठी दिला त्यामुळे कमलाभवानी मंदिर परिसरासह देवीचामाळचा चेहरा मोहरा बदलला आहे.
हे रस्ते सिमेंट काँक्रीट झाले –
संगोबा रस्ता ते पवार घर
मंदिर कल्लोळ ते पवार घर
सुभाष खोटे घर ते सनी पुराणीक घर
तुकाराम सोरटे ते पंकज थोरबोले घर
दिवाण घर ते व्यंकटेश दळवी घर
शशिकांत चव्हाण घर ते दीपक थोरबोले घर
पीर मंदिर समोरील मैदान.

हेही वाचा – दोनशे पेक्षा अधिक प्रवाशांनी तिकिटे काढली पण ती रेल्वे जेऊरला नीट थांबलीच नाही; जाता न आल्याने प्रवाशांना मनस्ताप व तरी

करमाळयाच्या राजकारणाला नवे वळण! एकमेकांचे कट्टर विरोधक तिघे एकत्र, मोहिते पाटलांची आ.शिंदेंना चेकमेट करण्यासाठी बाजार समितीच्या पार्श्वभूमीवर नवी खेळी.. वाचा सविस्तर

या ठिकाणी बसविले पेविंग ब्लॉक –
घाट पायऱ्या सभोवताली दोन्ही बाजूनी ब्लॉक मंदिरासमोरील बाग
मोरे गल्ली, पीर मंदिर व यमाई मंदिर समोर
जगताप गल्ली, वाघमारे गल्ली ,गोमे गल्ली, लक्ष्मी आई मंदिर बोळ, चव्हाण बोळ, जुनी ग्रामपंचायत बोळ, चोरमले बोळ, सोरटे – मोकाशी बोळ इत्यादी.

वाहनतळ ते खंडोबा मंदिर
स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता पार्किंग ते पांडे रस्ता या रस्त्यांचे बीबीएम पूर्ण झाले असून फक्त कार्पेट बाकी आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line