सोलापूरसोलापूर जिल्हा

परीट समाज सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष पदी प्रियांका गायकवाड यांची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

परीट समाज सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष पदी प्रियांका गायकवाड यांची निवड

केतूर(अभय माने) :-
महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ चे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी, जि. सोलापूर येथे संघटनेची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये समाजाच्या आरक्षण फाईल ची माहिती देण्यात आली तसेच आरक्षणासह समाजाच्या इतर विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये सोलापूर जिल्हा परीट समाजाचे नेते नामदेव नाना वाघमारे यांच्या उपस्थितीत व प्रदेश महिला कार्याध्यक्षा सुषमा अमृतकर यांच्या हस्ते करमाळा, जि. सोलापूर येथील प्रियांका सागर गायकवाड यांची महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड झाली. प्रियांका गायकवाड यांनी पूर्वी समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्षा पद भूषविले आहे.

प्रियांका गायकवाड यांच्या समाज संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष नियुक्ती ने त्यांचेवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
परीट सेवा मंडळ च्या झालेल्या या बैठकीमध्ये इतर काही समाजसेवकांच्याही संघटना कामामध्ये संघटना-पदावर संघटना पदाधिकारी व समाजबांधव यांच्या चर्चेतून नियुक्त्या झाल्या.

यामध्ये महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी संजय घोडके, प्रदेश युवा अध्यक्षपदी रवी राऊत, सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अजय सोनटक्के, तसेच सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी जयप्रकाश ननवरे यांची नियुक्ती झाली.

नियुक्ती नंतर सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ चे मुंबई-ठाणे विभागीय महासचिव संतोष सवतीरकर, वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मुरलीधर शिंदे, शांतीलाल कारंडे, संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार सुधिर खैरनार, लॉंड्री संघटना ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर कारंडे, तंटामुक्ती समितीचे राज्य उपाध्यक्ष देवा नवले,

हेही वाचा-कोरोना कालावधीत अभिनव भारत समाजसेवा मंडळाचे कार्य अनुकरणीय; पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे

ज्यांना स्वतःच्या गावच्या तलावात पाणी आणता आले नाही ते कसले पाणीदार आमदार ? कुणी केला नारायण पाटील यांच्यावर हा आरोप? वाचा सविस्तर

शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेचे प्रदेश संघटक दयानंद पवार, सोलापूर जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा कार्याध्यक्ष सावता वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र लोंढे, करमाळा तालुका अध्यक्ष बंडू शिंदे, पंढरपूर तालुका अध्यक्ष गणेश ननवरे, पंढरपूर शहर अध्यक्ष तथा पंढरपूर चे नगरसेवक विजय वरपे, पंढरपूर शहर अध्यक्ष रामेश्वर साळुंके, मंगळवेढा तालुका अध्यक्ष पंडित गवळी, मोहोळ तालुका अध्यक्ष नाना घोडके, महिला कार्याध्यक्षा मिनाक्षी पवार, सुभाष ननवरे, सागर गायकवाड, महावीर राऊत, अभिजित नवले, बापू ईशी, दशरथ सवणे, धनंजय ताटे, पांडुरंग राऊत, सचिन शिंदे, वैभव ननवरे, रविंद्र तरटे, नितिन शिंदे, उत्तरेश्वर कारंडे, अशोक ननवरे, मल्हारी ननवरे, अमर सुरवसे, दत्तात्रय काटकर, अकोला जिल्हा महिला अध्यक्षा विद्या सरसे आणि इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here