*पारेवाडीच्या उपसरपंच पदी गणेश खोटे बिनविरोध*
केत्तूर ( प्रतिनिधी) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील पारेवाडीच्या उपसरपंचपदी गणेश नवनाथ खोटे यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वीच्या उपसरपंच कौशल्या गुंडगिरे यांनी राजीनामा दिल्याने नवीन उपसरपंच निवड गुरुवार (ता.20) रोजी सरपंच वंदना नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मोतीकर उपस्थित होते.
करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहिर- दिनेश मडके
निवडीदरम्यान सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कौशल्या मधुकर गुंडगिरे, बापूसाहेब मोरे, संतोष शिंदे, इंदुबाई सोनावणे, सुनिता सरवदे,कालिदास मोहिते, केशव खोटे, गणेश गुंडगिरे, पांडुरंग नवले, अमोल खोटे, बंडू नवले, नामदेव गुंडगिरी, केशव खोटे,अजित सरवदे, पोपट नवले, प्रशांत सरवदे, अक्षय घाडगे, बापू पांढरे,अमोल लखदिवे, रामभाऊ धुमाळ, अमोल डरंगे, दशरथ गरुड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. निवड प्रक्रिया झाल्यानंतर नूतन उपसरपंच गणेश खोटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.