पारेवाडीत देवीच्या मुखवट्याची चोरी

पारेवाडीत देवीच्या मुखवट्याची चोरी

केत्तूर (अभय माने) पारेवाडी (ता. करमाळा) येथील गावामध्ये मध्यवस्तीत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मूर्तीच्या मुखवटा नुकताच चोरीला गेला आहे.

सकाळी देवदर्शनासाठी पुजारी दादा ढवळे हे गेले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. मुखवटा चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी माजी सरपंच महादेव पांढरे यांना व इतर ग्रामस्थांना माहिती दिली याबाबत करमाळा पोलिसाकडेही तक्रारही देण्यात आली आहे

.मंदिरामध्ये देवीचे मुखवटया खेरीज मोठ्या समया होत्या परंतु त्या तेथेच ठेवण्यात आल्या असून इतर काहीही साहित्य चोरीला गेले नाही हे विशेष.

सध्या आषाढ (आकाड) महिना सुरू असून देवीची पूजाअर्चा मोठ्या प्रमाणात केली जाते. अंधश्रद्धेपोटी देवीचा मुखवटा अज्ञातांनी चोरून नेला असावा असा ग्रामस्थांचा संशय आहे.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झाली चाळण; तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी

श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथील अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीची उत्तुंग बालवैज्ञानिक स्पर्धेतून निवड;इसरो, आयआयटी, सायन्स सिटी अहमदाबाद पाहण्याची संधी

मंदिरातील मूर्तीचा मुखवटा चोरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी नवीन मुखवटा प्रतिष्ठापणा शुक्रवार (ता.26) रोजी मोठ्या भक्ती भावाने करण्यात येणार आहे.

छायाचित्र :पारेवाडी – सदर मूर्तीच्या मुखवटयाची चोरी झाली आहे.

karmalamadhanews24: