परदेशी दांपत्याकडून श्रीराम प्रतिष्ठानचे आभार ,प्रतिष्ठानच्या वतीने परदेशी दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस साजरा

परदेशी दांपत्याकडून श्रीराम प्रतिष्ठानचे आभार ,प्रतिष्ठानच्या वतीने परदेशी दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस साजरा

करमाळा :- करमाळा येथील रहिवासी अभिषेक परदेशी व त्यांच्या सुविद्य पत्नी ऐश्वर्या परदेशी यांनी श्रीराम प्रतिष्ठानचे सामाजिक कामाबद्दल आभार व्यक्त करून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशजी चिवटे यांचा सत्कार केला. या दांपत्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्यालयात हार,नारळ व पुष्पगुच्छ देऊन केक भरून करण्यात आला.

श्रीराम प्रतिष्ठान करमाळा आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात सदर परदेशी दांपत्याचा विवाह गेल्या वर्षी दिनांक 11/02/23 रोजी संपन्न झाला होता.

यावेळी बोलताना अभिषेक परदेशी म्हणाले की, प्रतिष्ठान ने गेल्या वर्षी व या वर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न केला. सर्व नव वधू-वर, वऱ्हाडी यांची सर्व प्रकारची उत्तम सोय केली, श्रीराम प्रतिष्ठानचे सामाजिक कामाने मी प्रभावित झाल्यामुळे या वर्षी मी २-३ दिवस स्वयंसेवक म्हणून काम केले.भविष्यात ही प्रतिष्ठानच्या कामात मी हिरारीने सहभागी होणार आहे असे मत मांडले.

यावेळी बोलताना श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले की,श्रीराम प्रतिष्ठान च्या माध्यमातून आम्ही अन्नपूर्णा योजने अंतर्गत निराधार गरजू वृद्धांना,शाळकरी गरजू विद्यार्थी,रुग्णालयातील गरजू पेशन्ट यांना गेली 10-12 वर्षापासून मोफत
जेवण देतो.गेल्या व यावर्षी आम्ही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी केला.यापुढेही हे काम आम्ही निरंतर चालू ठेवणार आहोत मत व्यक्त केले,
यावेळी परदेशी दांपत्यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या टीमसाठी अल्पोपहाराची सोय केली होती.

हेही वाचा – लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

करमाळा कुटीर रुग्णालयाचे नाव बदलून ‘हे’ नाव देण्याची मागणी; तहसीलदार यांना निवेदन

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक विलास आबा जाधव जय श्रीराम यांनी केले,
या कार्यक्रमासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य पै.अफसर तात्या जाधव, रामभाऊ ढाणे ,काकासाहेब सरडे, दिलीप पाटील, गणेश महाडिक, शिवकुमार चिवटे ,कोरे महाराज ,संतोष महाराज ,महादेव गोसावी ,प्रसाद गेंड, निलेश चौधरी ,शरद कोकीळ ,संजय किरवे अक्षय गुड , संतोष जवकर आदी सदस्य उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line