परतीच्या पावसाची विश्रांती : व्यापारी वर्गाला दिलासा

परतीच्या पावसाचे विश्रांती : व्यापारी वर्गाला दिलासा

केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसापासून परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढू लागला आहे त्यामुळे उष्णता वाढली आहे.

दिवाळी सण जवळ आला असतानाही पाऊस होत असल्याने व्यापारी वर्गाची चिंता वाढली होती परंतु आता पाऊस थांबल्याने व्यापाऱ्यांनी चिंता काहीअंशी कमी झाली आहे.दिवसभर कडक ऊन, उकाडा जाणवत असल्याने उष्णता वाढली आहे. त्यातच दिवसा तसेच रात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथे आगळा वेगळा नऊ दिवस स्त्री जागर नवदुर्गांचा हा कार्यक्रम संपन्न

चैतन्य महेश कुलकर्णी चा डिजीटल मार्केटिंग एक्सलन्स आवार्डने पुणे येथे सन्मान

मध्यंतरी अधून मधून पडणारा पाऊस व बदलणाऱ्या वातावरणामुळे लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक थंडी,ताप,अंगदुखी,सांधेदुखी या आजाराने त्रस्त झाले आहेत.मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही अजूनही गारवा मात्र जाणवत नाही त्यामुळे दिवाळीत आणखीही अवकाळी पाऊस होती की काय ? अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.

karmalamadhanews24: