करमाळासोलापूर जिल्हा

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात कार्यक्रम करमाळा तालुक्यात विविध ठिकाणी साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात कार्यक्रम करमाळा तालुक्यात विविध ठिकाणी साजरा

करमाळा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बात कार्यक्रमांमध्ये देशाला संबोधित केले .या वर्षातील हा पहिलाच मन की बात कार्यक्रम होता .पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मन की बात मध्ये देशातील तरूणांना तुम्ही किती पुश अप्स काढू शकता असा प्रश्न केला.तसेच मणिपूरमधील २४ वर्षीय थौनाओजम निरंजॉय सिंहचं उदाहरणही सांगितलं.

थौनाओजमने १ मिनिटात तब्बल १०९ पुश अप्स काढत विक्रम केला आहे. यावेळी मोदींनी या युवकाकडून प्रेरणा घेण्याचंही आवाहन केलं.नरेंद्र मोदी म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. दिल्लीतील राजपथावर आपण देशाचं शौर्य आणि सामर्थ्याची झलक पाहिली.

त्यामुळे सर्वांना अभिमान वाटला आणि प्रेरणा मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश आपल्या या प्रयत्नांमधून राष्ट्रीय प्रतिकांना पुन: प्रस्थापित केलं जात आहे. इंडिया गेटजवळील ‘अमर जवान ज्योती’ आणि जवळच ‘National War Memorial’ मधील ज्योत एकत्र करण्यात आल्या.”


देशात पद्म पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांमध्ये असे अनेक चेहरे ज्यांना खूप कमी लोक ओळखतात. ते आपल्या देशांचे unsung heroes आहेत. त्यांनी सामान्य परिस्थितीत असामान्य काम केलंय. अमृत महोत्सवाच्या आयोजना दरम्यान देशात अनेक महत्वाचे राष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आले. यातील एक आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. हा पुरस्कार छोट्याशा वयात धाडसी आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या मुलांना दिला जातो,” असं मोदींनी सांगितलं.

या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने विविध ठिकाणी करण्यात आले होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष गणेश चिवटे ,मन की बात तालुका संयोजक दत्तात्रय पोटे ,सहसंयोजक दादासाहेब पाठक यांनी परिश्रम घेतले ,या कार्यक्रमाचे आयोजन करमाळा येथे महिला आघाडीच्या वतीने ही करण्यात आले होते.


यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, जेष्ठ नेते प्रदीप देवी, मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके ,प्रवीण बिनवडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष ऋषी फंड ,बाप्पू मोहोळकर ,मस्तान कुरेशी, महिला आघाडीच्या अश्विनी भालेराव ,संगीता नष्टे, राजश्री खाडे ,

हेही वाचा – पालकांनो सावधान : आत्महत्या करणाऱ्या नववीतील मुलीने चिठ्ठीत लिहले असे काही..

करमाळा शहरातील ‘या’ भागात बेकायदेशीर सावकारकीचा अतिरेक; पोलीस प्रशासनाने आळा घालण्याची मागणी

तसेच खडकी येथे मोहन शिंदे, गणेश गोसावी ,देवळाली येथे भैया गोसावी , वीट येथे भगवानगिरी गोसावी ,हर्षद गाडे ,दत्तात्रेय गाडे, मांगी येथे प्रकाश ननवरे ,कंदर येथे चैतन्य पाठक ,शेटफळे येथे राहुल रोंगे ,आवाटी येथे लखन चिरके, पांडे येथे नानासाहेब तक्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here