पंढरपूर

परप्रांतीय मजुरांना रेल्वेनं चिरडलं, 2 जागीच ठार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

परप्रांतीय मजुरांना रेल्वेनं चिरडलं, 2 जागीच ठार

पंढरपूर : पंढरपूरमध्ये रेल्वे रुळावर परप्रांतीय मजुरांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगड येथील मजुरांचा रेल्वे रुळावर अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

हा अपघात भीषण असल्याने अपघातात मृत्यू झालेल्या मजुरांचे शरीर धडावेगळे झाले होते. दरम्यान हा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी या घटनेची माहिती समजल्यावर लोकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

अपघात स्थळी दारुच्या बाटल्या आढळल्या असून मद्य प्राशन केल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काल मध्यरात्री हा अपघात घडल्याने याबाबत सकाळी लवकर याची माहिती समजल्याचे बोलले जात आहे. रात्रीबेरात्री अवैधरीत्या विक्री होणारी दारू आणि दारु पिण्यासाठी रेल्वे रुळावर गेल्यामुळे अपघात घडला असल्याची चर्चा सुरू होती.

litsbros

Comment here