क्राइमपंढरपूरसोलापूर जिल्हा

धक्कादायक: शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

धक्कादायक: शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून

शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा खून झाल्याची घटना पंढरपूर जिल्ह्यात समाेर आली आहे. ही धक्कादायक घटना माळशिरस  तालुक्यातील कुसमोड येथे घडली आहे. विकास वाघमारे असे खून झालेल्या युवकाचे नाव‌ आहे. या प्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात खूनाचा गुन्हा दाखल‌ करण्यात आला आहे.


विकास वाघमारे हे त्यांच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान मारेक-यांनी अंधाराचा फायदा घेवून विकासचे दोरीने हातपाय बांधून दांडक्याने व लोखंडी पाईपने त्याच्यावर वार केले.


मारेक-यांनी विकासच्या डोक्यात मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या खूनाची घटना जमिनीच्या वादातून घडली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पाेलिस त्या दिशेने देखील तपास करीत आहेत. दरम्यान सद्यस्थितीत अज्ञाता विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

litsbros

Comment here