पंढरपूरराजकारणसोलापूर जिल्हा

उद्या फैसला! पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक निकालाकडे सर्वांचे लक्ष

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उद्या फैसला! पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक निकालाकडे सर्वांचे लक्ष

पंढरपूर(प्रतिनिधी) 2014 नंतर बदलत्या समीरकणानंतर पंढरपूरात विधानसभेची निवडणूक पहिल्यांदाच दुहेरी झाली.. 2014 आणि 2019 यावेळी परिचारक, भालके आणि आवताडे गट एकमेकांविरोधात ठाकल्याने भालके विजयी झालेले होते.

आता या पोटनिवडणूकीत मात्र भाजपाने हे मतविभाजन टाळण्यासाठी परिचारक आणि आवताडे हे दोन्ही गट एकत्र करून आपल्या झेंड्याखाली आणले.

समाधान आवताडे यांनी 2014, 2019 अशा दोन विधानसभा लढविल्याने मतदारसंघाचा अभ्यास आणि बांधणी त्यांची होतीच त्याला परीचारक गटाची प्रामाणिक जोड दिल्यास पक्षाचा विजय आहे हे हेरून भाजपाने उमेदवारी माळ आवताडे यांच्या गळ्यात टाकली.

परिचारक फॅक्टर –
भाजपा असा पक्ष आहे जिथे पक्षातील नेत्याला पक्षादेश हा शीरसावंध्य मानुन काम करावे लागते.. भाजपात वरून एकाचा प्रचार आणि पाठीमागून दुसऱ्याच काम अस चालत नाही. परिचारक आज भाजपात आहेत पण ते समाधान आवताडे यांचे काम कितपत प्रामाणिक काम करतील याबाबत विरोधकांकडून शंकेच काहूर उठविलं गेलं. अर्थातच विरोधकांना भाजपाची काम करण्याची पद्धत आपल्यासारखीच आहे असा गैरसमज असावा. आपल्या पक्षात जे वरून एक आणि आतून एक चालते ते भाजपात चालत नाही याबद्दल कदाचित त्यांना माहिती नसेल.

परीचारक यांनी पंढरपूर शहर आणि ग्रामीण मध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम केल्याचे एकंदर मतदानानंतर जाणवते.

पंढरपूर
परीचारक यांच्या पंढरपूर तालुक्यातील सक्षमपणे चालविलेल्या संस्थात्मक कारभाराच्या माध्यमातून समाधान आवताडे यांना चांगले मतदान झाल्याचा अंदाज आहे..
पंढरपूर शहरात अनेक ठिकाणी जिथे भालके यांचा हक्काचा भाग, पॉकेट्स होते त्या पट्ट्यातील अनेक कार्यकर्ते हे मोहिते पाटील गटाचे होते.. जे मोहिते पाटलांमुळे भाजपाशी जोडले गेले.. याचाच परिणाम म्हणजे याभागातील काही मतदान केंद्रावर दुपारी 3 नंतर राष्ट्रवादीचे बुथ देखील टिकले नाहीत.

भालके यांच्या पंढरपूर शहरातील एखाद दोन आणि ग्रामीण मधील काही हक्काच्या भागात त्यांना अपेक्षे प्रमाणे मतदान झाल्याचा अंदाज आहे.

पंढरपूर तालुक्यातील गादेगाव जिल्हा परिषद गटात स्वाभिमानीचे उमेदवार जोरात चाललेले आहेत त्यांना मिळालेली मते ही भगिरथ भालके यांच्याच मतांतील विभागणी आहेत.

कासेगाव जिल्हा परिषद गटात स्वतः भगिरथ भालके यांचा पराभव झालेला आहे. यावेळी आवताडे गट , परिचारक गट आणि सोबतीला पक्षाचे चिन्ह यामुळे इथे झालेल्या एकूण मतदानाच्या जवळपास दोन तृतीयांश मतदान आवताडे यांच्या पारड्यात पडले असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इथेही भगिरथ भालके यांना निर्णायक मताधिक्य मिळण्याची शक्यता अतिशय धूसर आहे.

मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्यात स्थानिक भूमीपुत्राचा मुद्दा आणि 35 गावच्या पाण्याचा प्रश्न हाच मुद्दा ऐरणीवर राहिला आणि पूर्ण निवडणूक इथे याचं मुद्द्याभोवती फिरली.. मंगळवेढा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटात समाधान आवताडे चढत्या मताने मताधिक्य घेतील असा अंदाज आहे.

मंगळवेढा शहरात सुद्धा आपले चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांना 4 ते 5 हजार मते मिळून सुद्धा समाधान आवताडे चांगल्या लीडवर राहतील.
गेल्यावेळी मंगळवेढा तालुका आणि शहरात समाधान आवताडे यांचा वैयक्तिक करिष्मा आणि प्रभाव जसा होता तोच प्रभाव आत्ताही अबाधित राहिल्याचे जाणवतंय. मंगळवेढा तालुका आणि शहरात चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे जेवढी मते घेऊन समाधान आवताडे यांना डॅमेज करतील. थोड्या फार तेवढयाच मतांची भर परीचारक गट आणि भाजपाचे चिन्ह यांच्या रूपाने समाधान आवताडे यांच्या मतात पडलेली असेल.

हेही वाचा-कोंबड्यांच्या तुटवड्यामुळे तालुक्यात चिकन व अंड्याचे दर अचानकपणे वाढले

रेमिडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी शिवसेनेचे महेश चिवटे यांची ही खास मागणी

म्हणजेच मंगळवेढ्यात घरातील बंडखोरीमुळे होणारे नुकसान भरून निघालेले असेल.

आता यात मोहिते पाटील कार्ड किती काम करते व भालकेंना सहानुभूती तारते का.? उद्या नक्की समजेल. उद्याच्या निकालाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

litsbros

Comment here