भयंकर; पंढरपूरला निघालेल्या दिंडीत घुसली कार; अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू तर पाच वारकरी जखमी, क्लिक करून वाचा सविस्तर
सोलापूर, दि.31(जिमाका): सोमवारी सायंकाळी पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार ( MH-13 DE -7938) घुसून झालेल्या अपघातात जठारवाडी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर पाच वारकरी जखमी झाले.
हा अपघात सांगोला-मिरज रोडवर जुनोनी गावाजवळ सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान घडला. याबाबत सांगोला पोलिसात नोंद झाली आहे.
अपघातात मृतांमध्ये पाच महिला आणि दोन पुरुष वारकऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे –
शारदा आनंदा घोडके,
सुशीला पवार,
गौरव पवार,
सरामराव श्रीपती जाधव,
सुनिता सुभाष काटे,
शांताबाई सुभाष जाधव आणि
रंजना बळवंत जाधव (सर्व रा. जठारवाडी ता करवीर).
जखमी वारकरी असे-
अनिता गोपीनाथ जगदाळे (वय 60),
अनिता सरदार जाधव (वय 55),
सरिता अरुण सियेकर (वय 45),
शानुताई विलास सियेकर (वय 35)
आणि सुभाष केशव काटे (वय 67) सर्व रा. जठारवाडी.
MH-13 DE -7938
1) तुकाराम दामु काशिद रा.सोनंद ता सांगोला (चालक)
2) दिग्विजय माणसीग सरदार रा.पंढरपूर ता पंढरपूर
Comment here