धार्मिकपंढरपूरमहाराष्ट्र

वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये जीप घुसल्याने १४ वारकरी जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये जीप घुसल्याने १४ वारकरी जखमी

 आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकाऱ्यांच्या दिंडीमध्ये जीप घुसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात १४ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या राज्यभारातील वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ज्याप्रमाणे पंढरपुराकडे मार्गस्थ होतो. त्याप्रमाणेच राज्यभरातील अनेक गावांमधून छोट्या छोट्या दिंड्या जात असतात.

अशीच एक पायी दिंडीवारी पंढरपूराकडे जात असताना मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील केरेवाडी फाट्याजवळ वारकरच्या दिंडीत पिकअप जीप घुसल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात झाला असून यामध्ये जवळपास १४ वारकरी जखमी झाले आहेत.

दरम्यान, या जखमींना मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातानंतर जीप ड्रायव्हर पळून गेला आहे.

litsbros

Comment here