पंढरपूर

पुण्यस्मरणानिमित्त मगरवाडी व बिटरगाव येथिल जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पुण्यस्मरणानिमित्त मगरवाडी व बिटरगाव येथिल जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

उपळवटे (प्रतिनिधी-संदीप घोरपडे) ; पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी व बिटरगाव या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कै.बाळु श्रीरंग होमकुमरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

कै.बाळु श्रीरंग होमकुमरे हे मगरवाडी गावचे रहिवासी असून ते बिटरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बिटरगाव व मगरवाडी या दोन्ही गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित मगरवाडी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य मगरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टॉप आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच बिटरगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य कुंभार मॅडम कुंभार सर स्वप्नील होमकुमरे स्वप्नाली होमकुमरे भाऊ भारत होमकुमरे दीपक होमकुमरे सुनील होमकुमरे

प्रकाश होमकुमरे संकेत होमकुमरे प्रवीण होमकुमरे डॉ.प्रसाद कोळी सुनील कांबळे प्रवीण फरचंडे नितीन कोळी महादेव होमकुमरे सागर फरचंडे संदिप कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here