पांडे येथील ‘या’ पत्रकार मित्राने दिले टीटवी पक्षाला जीवदान
जेउर (प्रतिनिधी )पांडे येथील पत्रकार दस्तगीर मुजावर यांनी टिटिव पक्षाला जीवदान दिले आहे. पांडे ता. कोरोना चा संनसंर्ग मध्ये वाढ झाली आहे तर दुसरीकडे ऊन्हा तडाखा वाढल्याने उष्णता वाढी मुळे पशु पक्षा उष्णता सहन होत नसल्याने पक्षांना ही उष्णता त्रासदायक होऊ लागले आहे.
पत्रकार दस्तगीर मुजावर हे म्हसेवाडी येथे जात असताना राजकुमार जगताप यांच्या शेता जवळ रस्त्या च्या कडेला टिटिव पक्षा च्या चोची ला व तोंडला घट चिखलाने भरल्याने बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला त्यावेळी चिखलाने चोच घट झाल्याने चोच उघडता येत नव्हती त्यावेळी टिटिव पक्षाला मुजावर यांनी उचलुन नवनाथ जगताप याच्या मदतीने बेशुद्ध पडलेल्या टिटिव पक्षीची चिखलाने भरलेली चोच पाणी ने स्वच्छ धोवुन त्याच्या ऊपचार केले शुद्धीवर आल्यावर झाडाच्या सावलीत निसर्ग च्या सान्निध्यात सोडून दिले.
हा टिटिव पाण्या च्या जवळ राहाणारा पक्षी आहे. तलाव नाले बंधारे आटल्याने टिटिव पक्षावर हि वेळ आलीआहे ऊष्ण ते पासुन संरक्षण होण्यासाठी शेता मध्ये पाणी दिलेल्या पिकात गारव्याला च्या ठिकाणी राहात आहेत.
तलाव, ओढा, नदी, नाले, बंधारे पाण्याच्या ठीकाणी हा पक्षी आढुळन येतो. कर्कश आवाज करून शत्रुला जाण्यास भाग पाडतो.
हेही वाचा-कोंबड्यांच्या तुटवड्यामुळे तालुक्यात चिकन व अंड्याचे दर अचानकपणे वाढले
टिटवी पक्षाचा जिव वाचिवल्या बद्दल पत्रकार दस्तगीर मुजावर यांचे सुनिल भोसले, नवनाथ जगताप, सचिन जगताप, हारीदास आदलिंगे, लक्ष्मण वाघमारे, सुभोद भोसले आदी मित्र व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे .
Comment here