करमाळा सोलापूर जिल्हा

पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मुळे कोळगाव सबस्टेशनचा प्रश्न मार्गी – गणेश चिवटे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या मुळे कोळगाव सबस्टेशनचा प्रश्न मार्गी – गणेश चिवटे

करमाळा – कोळगाव सब स्टेशन वर आधारित पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांचा गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित लाईटचा प्रश्न आता मार्गी लागला आहे, कोळगाव सब स्टेशन वरील आधारित शेतकऱ्यांनी भाजपा नेते गणेश चिवटे यांच्याकडे लाईट विषयासंदर्भात तक्रार केली होती यावेळी गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला यावर लगेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष देऊन या कोळगाव स्टेशन आवश्यक असणाऱ्या दोन ब्रेकरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या भागातील गावांना अपुऱ्या दाबाने होत असलेला वीस पुरवठा आता पूर्ण दाबाने आठ तास सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.


या नवीन ब्रेकर चे पूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी गणेश चिवटे म्हणाले की कोळगाव सब स्टेशनचा गेली अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष देऊन मार्गी लावला आहे लवकरच ते या सबस्टेशनवर 3 KVA ऐवजी 5 KVA चा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून या सबस्टेशनचा कायमस्वरूपी चा विजेचा प्रश्न मार्गी लावतील तसेच या भागातील रस्ते व इतर कामेही पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावू असे मत यावेळी गणेश चिवटे यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे,
कोळगाव चे सरपंच तात्यासाहेब शिंदे , गौंडरेचे सरपंच सुभाष हनपुडे , हिसरे गावचे सरपंच नवनाथ जगदाळे , वंचित बहूजन आघाडीचे नेते सुभाष ओहोळ, श्रीमंत पाटील, गणेश महाडीक, नाना अनारसे,वैजिनाथ चव्हाण, भाऊ चव्हाण, अजय डौले, विशाल घाडगे, रावसाहेब पाटील, दत्ता विटुकडे, ओमकार पूजारी ,नाना पुजारी, भागवत पाटील, पै. विजय विटुकडे, पै. हनुमत पाटील, गणेश रोकडे, ज्ञानेश्वर बिचीतकर ,अक्षय हनपुडे, समाधान शिंदे , अतुल चेंडगे, चरण चेंडगे, हंनुमत आतकरे, सुनील जगदाळे, तात्या जगदाळे, उमेश जगदाळे, सौरभ जगदाळे ,रामा कराडे, सिध्देश्वर जगदाळे, भिमराव जगदाळे, दत्ता ठोंबरे , संतोष जगदाळे ,आत्माराम खडके, वैभव खडके, युवराज पाटील, आबा पाटील, नितीन शिंदे, मिलिंद रोकडे, गणेश रोकडे ,दया चेंडगे, समाधान शिंदे, बालाजी गोरे, निखिल वीर, श्रीमंत मोरे, पिंटू निंभोरकर, सचिन माने, हनुमंत अतकरे,अभी शिंदे, राजाराम हराळे, चरण शिंदे, परशुराम शिंदे
आदी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा – वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित. अक्कलकोट देवस्थानचे स्वामीसेवेसह आरोग्य व शिक्षण विषयक कार्य इतरांना अनुकरणीय. – प्रा. गणेश करे पाटील.

जिल्हास्तरीय सैनिक कुटुंबीय संरक्षण समितीमधे करमाळ्याचे ऑनररी कॅप्टन अक्रूर शिंदे यांची निवड

कोळगाव सब स्टेशन वर आधारित आमच्या पाच ते सहा गावांचा विजेचा प्रश्न प्रलंबित होता आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील लोक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला परंतु हे काम मार्गी लागले नाही, पण गणेश चिवटे यांनी पालकमंत्र्यांनकडे पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले
सुभाष हनपुडे- सरपंच गौंडरे

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!