कुर्डुवाडीसोलापूर जिल्हा

पदोन्नती आरक्षण रद्द करणारा निर्णय तात्काळ मागे घ्या; फासेपारधी संघटनेचे कुर्डुवाडी प्रांतांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पदोन्नती आरक्षण रद्द करणारा निर्णय तात्काळ मागे घ्या; फासेपारधी संघटनेचे कुर्डुवाडी प्रांतांना निवेदन

केम(प्रतिनिधी) ;

महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय समाजाचे पदोन्नती आरक्षण रद्द करणारा निर्णय घेतला . हा निर्णय तत्काळ रद्द करावा अशा मागणीचे निवेदन कुर्डुवाडी प्रांताधिकारी यांना महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी संघटनेचे सचिव सुरेश पवार, दिगांबर काळे, व संघटनेतील कर्मचारी वर्ग, महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय संघटना यांच्या वतीने देण्यात आले.


या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, मागासवर्गीय पदोन्नती मधील 33% आरक्षण रद्द करणारा दुर्दैवी निर्णय दिनांक 07/05/2021 रोजीचा शासन निर्णय असंवैधानिक व बेकायदेशीर असल्याने तत्काळ रद्द करावा .

तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका मधील अंतिम निर्णयाचे अधीन राहून मागासवर्गीय च्या कोट्यातील पदोन्नती चे 33% रिक्त पदे बिंदूनामावली नुसार भरणे.

हेही वाचा-ग्रामीण भागातील कृषीविषयक दुकाने ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू;जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

करमाळा पोलिसांनी पकडली संत्रा देशी दारूच्या बॉक्स ने भरलेली बोलेरो; 7 लाखापेक्षा जास्त किमतीचा माल जप्त

तसेच महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेचे सचिव सुरेश पवार यांनी पदोन्नती मधील आरक्षण निर्णय घेणारया समितीच्या मा. मुख्य सचिव यांना वगळून मागासवर्गीय प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी अशी मागणी सुरेश पवार यांनी केली.

litsbros

Comment here