पद्मश्री आनंद कुमार यांनी केला प्रा. गणेश करे पाटील यांच्या कार्याचा गौरव
केत्तूर (अभय माने) :भारताच्या अवकाश संशोधन संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ अरुण कुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्य मंदिरात दिशा अकॅडमी वाई आयोजित हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
प्रज्ञावंत सन्मान सोहळ्यात भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आनंद कुमार यांनी यशकल्याणी सेवाभावी संस्था अध्यक्ष प्रा.गणेश करे पाटील देत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला .
यावेळी प्रा. करे पाटील यांनी यशकल्याणी संस्थेच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आनंद कुमार यांना मानपत्र व अध्यक्ष डॉ अरुण कुमार सिन्हा यांना विशेष भेट देऊन गौरविण्यात आले .
यावेळी व्यासपीठावर इसरो चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ अरुण कुमार सिन्हा यांच्यासह टिळक महाराष्ट्र विद्यापीठ नाशिक येथील शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.दिलीप देशमुख, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा विजय पवार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सल्लागार प्रा.डॉ.प्रशांत कुलकर्णी, दिशा अकॅडमी चे अध्यक्ष नितीन कदम, व्यवस्थापकीय संचालिका प्रा रूपाली कदम, संचालक प्रशांत सातव प्रा.सतीश मौर्य,
बुद्धिबळ स्पर्धेत आकांक्षा क्षिरसागर हिची जिल्हा पातळीसाठी निवड
जीवन शिक्षण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा जयेश पवार, सोलापूर इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रा बाळकृष्ण लावंड , प्रा विष्णू शिंदे ,यशकल्याणी नेचर काँझरवेशन सोसायटीचे अध्यक्ष कल्याणराव साळुंके प्रा नितीनकुमार आनंद प्रा राजेंद्र दुशिंग झरीना खान दिशा अकॅडमी चे आय आय टी एन स्टाफ तसेच दहावी बारावी चे बहुसंख्य विद्यार्थी व पालक आणि मान्यवर उपस्थित होते.