जगभर धुमाकूळ घालणारा ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव, दोन बाधित सापडले
जगभर धुमाकूळ घालणारा ओमायक्रॉनचा भारतातही शिरकाव झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात ओमायक्रॉनची 2 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या केसेस कर्नाटकात आढळून आल्या आहेत. 66 वर्षीय पुरुष आणि 46 वर्षीय पुरुषामध्ये ओमायक्रॉन संसर्ग आढळून आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमायक्रॉनची 373 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
जग अजूनही कोविडच्या प्रकरणांमध्ये तेजी पाहत आहे. गेल्या एका आठवड्यात, जगातील 70% प्रकरणे युरोपमधून आली आहेत. युरोपमध्ये आठवडाभरात 2.75 लाख कोविड रुग्ण आले आणि युरोपमध्ये एका आठवड्यात 29,000 हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.
आतापर्यंत, देशातील लोकांना 125 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस दिले आहेत. 84.3% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि 45.92% लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
देशात अशी दोन राज्ये आहेत जिथे 10,000 हून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. ते म्हणजे केरळ आणि महाराष्ट्र. केरळमध्ये 44,000 सक्रिय प्रकरणे आहेत आणि महाराष्ट्रात 11,000 प्रकरणे आहेत. कोविडची 55% प्रकरणे देशातील या दोन राज्यांमधून येत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती; शैक्षणिक पात्रता काय?, पगार किती? वाचा
एलपीजी सिलिंडर महागला ; सलग दुसऱ्या महिन्यात मोठी दरवाढ, व्यावसायिकांना जबर दणका
देशात सध्या कोविडचे 99,763 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोविडचे 9,765 नवीन रुग्ण आढळले आहेत.
Comment here