करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात वृद्धांचे होम वोंटिग सुरू

करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात वृद्धांचे होम वोंटिग सुरू

केत्तूर ( अभय माने ) निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रमानुसार वयोवृद्ध ज्येष्ठ मतदार यांचे घरी जाऊन मतदान घेण्यात आले.

करमाळा तालुक्याचे ग्रामीण भागात गृहमतदान (होम वोटिंग) सुरुवात झाली असून, त्यानुसार केत्तूर नंबर 2 ( ता.करमाळा) येथील सरुबाई अण्णा ठोंबरे,मथुराबाई बन्शी विघ्ने,शहाबाई काळे यांच्या राहत्या घरी मतदानाचा हक्क बजावताना सदर निवडणूक पथकामध्ये केंद्रीय क्षेत्रीय अधिकारी एस. एस. गवसने,मंडल अधिकारी संतोष गोसावी ,बीएलओ विकास काळे,ग्राम महसूल अधिकारी संतोष कानतोडे,सूक्ष्म निरीक्षक एम एम शिंदे,ग्राम महसूल अधिकारी एस. लोमटे,पोलीस कॉन्स्टेबल भाऊराव शेळके यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

छायाचित्रे केत्तूर : 1) निवडणूक कर्मचारी
2)मतदान करताना मथुराबाई बन्सी विग्ने

karmalamadhanews24: