ऊस उत्पादकांना दराची प्रतीक्षा

*ऊस उत्पादकांना दराची प्रतीक्षा*

केत्तूर (अभय माने) उजनीचे लाभक्षेत्र लाभलेल्या करमाळा तालुक्यात एकापेक्षा एक असे चार साखर कारखाने आहेत, त्यामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना, मकाई सहकारी साखर कारखाना , याबरोबरच कमलाई शुगर व भैरवनाथ शुगर असे चार साखर कारखाने आहेत परंतु यापैकी एकही कारखाना यावर्षी गाळप हंगाम सुरू करू शकला नाही ही मोठी शोकांतिका आहे. अर्थात तालुक्यातील सर्व कारखाने बंदच आहेत त्यामुळे वरील कारखान्यांच्या सभासदांना आता ऊस गाळपसासाठी पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कारखान्यांना ऊस नेता का ऊस अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरील चार साखर करखान्याच्या जीवावर हजारो हेक्टर क्षेत्रात उसासारखे पीक घेतले आहे मात्र अद्याप वरील चारही साखर कारखान्याची धुराडीच पेटली नसल्याने आता एवढा मोठा ऊस घालायचा कुठे ? असा पेच पडला आहे. मात्र त्यातूनही अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी बारामती अग्रो (जिं.पुणे) तसेच अंबालिका शुगर (जि.अहिल्यानगर) व इतर कारखान्याकडे देऊन कसा बसा घालवून चार पैसे करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तसेच ऊस गाळप हंगाम सुरू होऊन जवळजवळ महिन्याचा कालावधी होत आला तरी बहुतांश साखर कारखान्यांनी उसाचा दर अद्यापपर्यंत जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांना दराची मोठी प्रतीक्षा लागून राहिली आहे.

बारामती ॲग्रो कारखाना पुणे जिल्ह्यातील कारखान्याप्रमाणे दर देणार का ? की त्याहून अधिक दर देणार ? याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागन राहीले आहे.साखर कारखान्यांनी ऊसाच्या एफआरपी प्रमाणे रास्त व किफाययतशीर दर जाहीर करावा असे सूचना साखर उपसंचालकांनी दिलेल्या आहेत. साखर कारखाने दर जाहीर करणार की नाही हा प्रश्न आहेच.सध्या साखरेची एसएसपी (किमान आधारभूत किंमत) 3400 रुपये आहे त्यामुळे ऊसाला यावर्षी किमान4000 ते 4200 रुपये दर मिळणे अपेक्षित आहे.

हेही वाचा – जैविक खतांचा वापर करून सर्वाच्च उत्पादन घेतल्या बदल* *डाॅ.संजय साळूंके यांना राष्ट्रीय स्तरावरील मिलेनियम फार्मर आँफ इंडिया पुरस्कार प्रदान

कुगाव-शिरसोडी पुलाचे काम प्रचंड वेगात चालू….

तालुक्यातील पश्चिम भागातील (उजनी लाभक्षेत्र परिसर) शेतकऱ्यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत न नेहत जाणीवपूर्वक त्याची आडवा आडवी आणि जिरवा जिर्वी केली जाते यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस शेतीला फाटा देऊन केळी, पपई, पेरू, डाळिंब या फळ बागाकडे आपला मोर्चा वळविला आहे त्यामुळे ऊसाखालील क्षेत्र मात्र वरचेवर कमी होत आहे.

karmalamadhanews24: