निवृत्तीनाथांच्या पालखीचे परतीच्या मार्गावर केम येथे तोफांचा सलामीने स्वागत

निवृत्तीनाथांच्या पालखीचे परतीच्या मार्गावर केम येथे तोफांचा सलामीने स्वागत

केम प्रतिनिधी संजय जाधव); पंढरपूर येथून पौर्णिमा चा काला घेऊन त्र्यंबकेश्वरला निघालेल्या पालखीचे परतीच्या मार्गावर केम येथे दि, ५जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता आगमन झाले या वेळी केम ग्रामस्थ व श्री राम भजनी मंडळ यांच्या वतीने तोफांचा सलामीने जोरदार स्वगत करण्यात आले.

त्यांनतर पालखी श्रीराम मंदिराकडे निघाली यावेळी संपूर्ण केम नगरी निवृत्ती नाथ महाराज की जय अशा नाम घोषाने दुमदुमून गेली.

भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पालखी गांधी चौकात आल्यावर श्रीमंत बोंगाळे यानी वारकऱ्यांना मोफत पाण्याच्या बिस्लरी वाटप केल्या पालखी श्रीराम मंदिरात प़ोहचल्या नंतर श्रीची आरती झाली त्यानंतर ग्रामस्थांनी वारकऱ्यांना भोजन दिले.

रात्री ९ते११या वेळेत निवृत्ती नाथ महाराज यांचे पुजारी ह, ,भ,प, गोसावी महाराज यांचे वाटचालीचे कीर्तन झाले त्यानंतर गावकऱ्यांचा हरिजागर झाला सकाळी ठिक सात वाजता ग्रामस्थांच्या पुजा झाल्या.

हेही वाचा – करमाळ्यातील बागल शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सतीश कांबळे, विकास काळे व्हाईस चेअरमन

केंद्र सरकारकडून महिलांना 6000 रुपये, लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे लागतील? वाचा सविस्तर माहिती

त्यानंतर माजी जि,प, सदस्य संजय देवकर, बाबा मोरे यांनी वारकऱ्यांना सकाळी नाष्टा दिला पालखी ने निंभोरे झरे कडे पुढील मुक्कामी प्रस्थान ठेवले या वेळी केम ग्रामस्थानी निवृत्ती नाथ महाराज पालखी स निरोप दिला या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

karmalamadhanews24: