निर्माण संस्थेच्या वतीने भटक्या विमुक्त समाजातील इयत्ता आठवी ते दहावी च्या गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वाटप

निर्माण संस्थेच्या वतीने भटक्या विमुक्त समाजातील इयत्ता आठवी ते दहावी च्या गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वाटप

इंदापूर(प्रतिनिधी); दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्माण संस्थेच्या वतीने इंदापूर तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजातील इयत्ता आठवी ते दहावी च्या गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वाटण्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लासूर्ने येथे कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी जिल्हा प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक माननीय धायगुडे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भोसले सर, डॉ. अमरजीत नरुटे, जंक्शन पोलीस स्टेशन चे चौधर साहेब उपस्थित होते.

भटक्या विमुक्त समाजातील मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्माण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माननीय संतोष जाधव सर तसेच वैशाली भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी शैक्षणिक काम केले जात आहे.

हेही वाचा – आजारी आजोबांना भेटण्यासाठी पुण्याहून करमाळयाला येताना अपघात; जखमी तरुणाचे निधन

करमाळा तालुक्यातील जेऊर, चिखलठाण, गौंडरे यासह १३ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश; वाचा, कोणत्या ग्रामपंचायतीवर कोण आहे प्रशासक?

मागील वर्षी मुलींना शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात आली होती. यावर्षी मात्र एकूण ११० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४००० रू. याप्रमाणे तीन वर्षासाठी ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

यावेळी निर्माण संस्थेचे संकेश सर, दिपाली ताई, पुष्पाताई, दीक्षा चंदनशिवे, अश्विनी चव्हाण, आशा कांबळे, प्रियंका ताई उपस्थित होत्या
या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे रवी पवार सर यांनी केले.

karmalamadhanews24: