निमगाव टे केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
उपळवटे (संदिप घोरपडे); या आँनलाईन झालेल्या शिक्षण परिषदेचे स्वागत व सूत्रसंचालन आनंद गोडसे सर विशेष शिक्षक जि प शाळा कण्हेरगाव यांनी केले. प्रास्ताविक श्री मनोज पवार केंद्रप्रमुख निमगाव टे यांनी केले. NAS अंतर्गत होणाऱ्या सर्व्हेक्षण विषयी खालील शिक्षकांनी अभ्यासपूर्ण व सविस्तर माहिती दिली.
इयत्ता 3 री श्री समाधान कोळी सर जगतापवस्ती, इयत्ता पाचवी श्री ज्योतीराम तळेकर सर उपळवटे, इयत्ता आठवी बालाजी पाटील सर मा. ब शिंदे माध्यमिक विद्यालय अकोले खुर्द शालेय उपक्रमांतर्गत केंद्रातील खालील शिक्षकांनी सखोल माहिती दिली.
स्वच्छ शाळा कृती आराखडा श्री अरविंद सुरवसे सर जि प शाळा उपळवटे यांनी उदाहरणासह माहिती दिली.
स्वाध्याय उपक्रमाबाबत सहभाग कसा वाढवावा या विषयावर एम एम एस दहिवली हायस्कूलचे शिक्षक श्री ढगे सर यांनी सखोल माहिती दिली.
ऑनलाइन ऑफलाइन अध्यापनातील ठळक व वेचक उपक्रमाचे सादरीकरण अकोले खुर्द शाळेच्या शिक्षिका श्रीमती क्षीरसागर मॅडम यांनी केले.4 माझी शाळा,माझे उपक्रम अंतर्गत कार्यान्वित केलेले विविध उपक्रमाची माहिती फूटजवळगाव शाळेचे शिक्षक श्री प्रमोद लोंढे सर यांनी दिली.
हेही वाचा – हॉटेलात नाष्टा करायला गेला बाप आणि चाणाक्ष पोलिसांना सापडला मुलाचा खुनी
पत्नीचे अनैतिक संबंध, CRPF जवानाचा सासरवाडीच्या लोकांवर गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू
प्रशासकीय बाबी व पंचायतराज दौरा, यशवंतराज दौरा, आयुक्त पथक याबद्दल कोणते रेकॉर्ड कसे अद्यावत करावे याबद्दलची माहिती केंद्रप्रमुख मनोज पवार यांनी दिली. मोतीराम शिंदे सर, ज्ञानेश्वर चटे सर, पाटोळे सर, सुरेश काळे सर, अरविंद सुरवसे सर यांनी विविध विषयांची मांडणी करून चर्चा केली. तसेच विविध विषयावर केंद्रातील सर्व शिक्षकांनी चर्चेत सहभाग घेतला.
या शिक्षण परिषदेला केंद्रातील एकूण 51 शिक्षक उपस्थित होते. शेवटी सभेची सांगता केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चटे यांनी आभार मानून केल.
Comment here