रक्तदात्यांचा सन्मान करुन अनोख्या पद्धतीने निमगाव येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा!
जेउर (प्रतिनिधी) ;
शिवसंस्कर प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवसंस्कर प्रतिष्ठान च्या वतीने ९६ रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला .
करमाळा तालुक्यातील निमगाव(ह) येथे शिवसंस्कार प्रतिष्ठान च्या वतिने ३१ मार्च रोजी तिथी प्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला होता व या सोहळ्या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते, या शिबिरात तब्बल ९६ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवरायांना आभिवादन केले होते .प्रथमच आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.
शिवसंस्कर प्रतिष्ठान च्या आवाहनास प्रतिसाद देवून ९६ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सर्व रक्तदात्यास सहा लिटरचा पाण्याचा जार भेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंस्कार प्रतिष्ठान चे ऋषीकेश चव्हाण, मा. ग्रा.सदस्य अमोल भोसले ,सोमनाथ हालकरे, विक्रम कुंभार, दादासाहेब भोसले आदींनी परिश्रम घेतले
यावेळी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे, बालाजी इंगळे, जगदीश निळ पाटील, तुषार नीळ,नवनाथ रोकडे , मच्छिंद्र लोखंडे
संतोष शिंगण ,लक्ष्मण जगदाळे, श्रीराम निळ,समाधान टकले,हनुमंत गोसावी आदि उपस्थित होते.
हेही वाचा-‘शिवराज्याभिषेक’ दिनानिमित्त महाराजांच्या कार्याचा गौरव करणारा शगुफ्ता शेख यांचा विशेष लेख
कोरोनाकाळात रक्ताचा प्रंचड तुडवडा निर्माण झाला होता त्या मुळेच सामाजिक जबाबदारीतून आम्ही शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते आज शिवराज्याभिषेक दिना निमित्त त्या रक्तदात्यांचा सन्मान करुन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यात शिवसंस्कर प्रतिष्ठान च्या वतीने समाज हिताचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत.
– ऋषिकेश चव्हाण
संस्थापक
शिवसंस्कर प्रतिष्ठान
Comment here