नेताजी सुभाष विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन.

नेताजी सुभाष विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन.

केत्तूर (अभय माने) दूरदृष्टीचा राजा, रयतेचा राजा, महाराजांचा महाराज, असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सनातनी व्यवस्थेच्या विरोधात आधुनिक मानवतेचे विचार जोपासले,त्यांनी शिक्षण,शेती,आरोग्य,अंधश्रद्धा निर्मूलन,अशा आधुनिक विचारांची पायाभरणी करवीर संस्थानात करून कोल्हापूरचे नाव इतिहासात अजरामर केले,अशा शाहू महाराजांचा जन्मदिन आज ‘सामाजिक न्यास दिन’ म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन सहशिक्षक के .सी.जाधवर यांनी केले.

ते येथील नेताजी सुभाष विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.जी.बुरुटे होते.यावेळी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

यंदा जांभूळ खाणे झाले दुर्मिळ; दरही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर 

कार्यक्रमाला प्राचार्य बुरुटे, पर्यवेक्षक के.पी. धस, पालक श्री.जरांडे, कोकणेगुरुजी, श्री.पाटील, सौ.देवकते, विजय देवकते यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते. सहशिक्षक आर.डी मदने यांनी आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line