केत्तूर येथील नेताजी सुभाष विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

केत्तूर (अभय माने) नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर (ता.करमाळा) येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक विवेक निसळ,किर्ती पानसरे यांनी दाखवून दिली.

यावर सर्व विद्यार्थ्यांनी योगासने केली.यावेळी प्राचार्य भिमराव बुरूटे यांनी मार्गदर्शन केले.योगासनाचे महत्व किशोर जाधवर सर यांनी सांगितले.आभार रामचंद्र मदने यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा – उजनी जलाशयातील जलवाहतूक ठप्प; विद्यार्थी, नागरिकांचे हाल; नियम व अटी घालून जलवाहतूक सुरू करण्याची मागणी

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या; एक महिन्यानंतर सर्व विभागांचा आढावा मला द्या; आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

योगा हा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक सराव आहे.तसेच रोज नियमित योगा केल्याने आरोग्य उत्तम राहते.तसेच योगाचे महत्त्व विवेक निसळ यांनी विद्यार्थ्यांना अगदी कमी कालावधीत सहजरित्या पटवून सांगितले.यावेळी विद्यालयातील 735 विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेसह 25 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या योगाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line