करमाळयात नवनियुक्त नायब तहसीलदार माजीद भाई काझी यांचा सत्कार संपन्न
करमाळा (प्रतिनिधी तालीम शेख); दिनांक 13/10/2023 रोजी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व सकल करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे करमाळा तहसील कार्यालयात नवनियुक्त नायब तहसीलदार मा. माजीद भाई काझी ( भाईजान ) यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . तसेच प्रशांत ढाळे ( माजी नगराध्यक्ष क.न.पा.करमाळा ) यांच्या वाढदिवसानिमित्त व नवनियुक्त तलाठी मोईज सय्यद ( माढा विभाग ) यांचाही सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना माजीद काझी साहेब यांनी सांगितले की प्रशासनात काम करताना उपेक्षित घटकांना समोर ठेवून शासनाच्या सर्व योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी कटिबद्ध असुन आजपर्यंत आलेल्या प्रत्येक नागरिकाचे काम करुन देणे त्यातील त्रुटी दूर करून काम यशस्वीपणे पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्या नोकरीच्या पुर्ण शासकीय कार्यकाळात काम केले आहे व यापुढेही उरलेला नौकरीचा कार्यकाळ सामान्य नागरिकांनच्या प्रश्न सोडविण्यासाठी घालविणार आहे नागरिकांनी निःसंकोचपणे माझ्या कडे येऊन हक्काने काम करुन घेवून जाणे असे सत्काराला उत्तर देताना सांगितले आहे.
माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे बोलताना म्हणाले की मी राजकारणात जरी असलो तरी माझ्या राजकीय नेतृत्व बाजुला ठेवून माझ्या प्रभागातील सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन घरातील कुटुंबा प्रमाणे अडी अडचणी दूर केली आहे त्यामुळे लोकांच्या प्रेमामुळेच आजपर्यंत एवढी मजल मारली आहे.
जेष्ठ पत्रकार नासीर भाई कबीर यांनी बोलताना सांगितले की भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांनी मुस्लीम समाजाला सर्व सामाजिक, शैक्षणिक, युवकांना रोजगार उपलब्ध होईल किंवा मुस्लीम समाजातील विविध लोकोपयोगी उपक्रम राबवुन इतर समाजाबरोबर सौहार्दाचे व सलोख्याचे संबंध कसे तयार होईल व मुस्लीम समाजाचे प्रबोधन व प्रगतीचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी समीर शेख ( संस्थापक मार्गदर्शक भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा )आलिम भाई शेख ( पत्रकार ),जाकीरभाई शेख ( आएशा मस्जिद चे सदस्य),
युसुफ भाई बागवान ( मंडळ अधिकारी करमाळा ), हाजी उस्मान सय्यद ( जामा मस्जिद सदस्य ), सुरज शेख ( सचिव रहनुमा ट्रस्ट ), राजु बागवान (उद्योजक ), आझाद शेख ( राष्ट्रवादी उपाध्यक्ष करमाळा ), जाकीरभाई वस्ताद,
इम्तियाज पठाण, फिरोज बेग, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, समीर बागवान, राजु बेग,आकील शेख,आरबाज बेग, आलीम खान, शाहिद बेग, उपस्थित होते या कार्यक्रम चे आभार रमजान बेग( सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा) व जमीर सय्यद ( विश्वस्त जामा मस्जिद ) यांनी केले आहे.