जैविक खतांचा वापर करून सर्वाच्च उत्पादन घेतल्या बदल
डाॅ.संजय साळूंके यांना राष्ट्रीय स्तरावरील मिलेनियम फार्मर आँफ इंडिया पुरस्कार प्रदान
केत्तूर (अभय माने) वाशिंबे (ता करमाळा) येथील डॉ . संजय साळुंके यांना कृषी क्षेत्रातील सर्वोच्च संशोधन संस्था आयसीएआर (ICAR) यांच्या वतीने शेतीतील केळी आणि ऊस पिकातील जैविक खतांचा वापर करून उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील “मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया” हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार दिल्ली येथे कृषी जागरण, महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि आयसीएआर (ICAR) यांच्या संयुक्तपणे आयोजित आयसीएआरच्या पुसा कॅम्पसमधील एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
हेही वाचा – विठ्ठलवाडीचे राजेंद्र गुंड जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित
जनसेवा हिच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशनच्या सभासदांचा आदर्श गाव पाटोदा ला अभ्यास दौरा
या पुरस्कारासाठी त्यांची निवड आयसीएआर (ICAR) या संस्थेने केली होती.
शेतीत नवनवीन गोष्टींचा अवलंब करत शेती फायद्याची कशी करता येईल यावर त्यांचा भर असतो.बायोमी टेक्नॉलॉजीज कंपनीच्या अग्री इनपुट ट्रेनिंगमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.त्यांच्या या सगळ्या प्रवासात बायोमी टेक्नॉलॉजीज कंपनीचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि सीईओ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
भारतातून एकूण 22000 शेतक-यांनी या पुरस्कारारासाठी अर्ज केले होते.
सदर कार्यक्रमासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शेतकरी पुसा कॅम्पसमध्ये उपस्थित होते.