करमाळाशैक्षणिकसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

पोमालवाडी येथे मा.आ.पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाचे लवकरच होणार उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोमालवाडी येथे मा.आ.पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाचे लवकरच होणार उद्घाटन

जेउर (प्रतिनिधी); करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष अनिरुद्ध(आण्णा)कांबळे व करमाळा तालुक्याचे किंगमेकर मा.श्री.अजित(दादा)तळेकर यांच्या विशेष सहकार्याने तालुक्यातील सर्वसामान्य लोकांची कामे केली जात आहेत. 

सर्व सामान्य जनतेला पाटील यांची भेट जरी घ्यायची म्हटलं तरी या टोकापासून त्या टोकापर्यंत जावं लागत होतं, पश्चिम भागात लोकांच्या हितासाठी व दिवेगव्हान, पारेवाडी, केत्तुर-१ व २,पोमलवाडी, खातगाव-१,२,३टाकळी, कोंढार-चिंचोली, कात्रज,

जिंती,रामवाडी,कावळवाडी,भगतवाडी,गुलमोहरवाडी,हिंगणी,भिलारवाडी या गावातील जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

आपल्या नेतृत्वाच्या व सामान्य जनतेच्या व करमाळा तालुक्यातील पश्चिम भागाच्या जनतेच्या आडी-अडचणी सोडवण्यासाठी मौजे-पोमालवाडी, ता.करमाळा येथे शिवसेना नारायण (आबा) पाटील जनसंपर्क कार्यालयाचे काम पूर्ण केले असून पुढील आठवड्यात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.

तसेच भविष्यातील पिढी घडवण्याची असेल तर एक वाचनालय आसव म्हणून श्री.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय उघडण्यात आले असून याचेही उदघाटन करण्यात येणार आहे. अशी माहिती पश्चिम भागातील मा.आ.पाटील गटाचे समर्थक संजय फडतरे यांनी करमाळा माढा न्यूजशी बोलताना दिली.

litsbros

Comment here