करमाळामनोरंजन

नागराज मंजुळेचा वादग्रस्त ‘झुंड’ होणार जूनमध्ये प्रदर्शित; ‘हा’ होता वाद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नागराज मंजुळेचा वादग्रस्त ‘झुंड’ होणार जूनमध्ये प्रदर्शित; ‘हा’ होता वाद

गेले अनेक महिने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘झुंड’ला अखेर प्रदर्शनाची तारीख मिळाली. येतोय नागराज मंजुळे यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट_

नंदी चिन्नी कुमार नामक एका व्यक्तीनं या चित्रपटावर कॉपी राईट्सचा दावा ठोकला होता. या व्यक्तीच्या मते ‘झुंड’ चित्रपटाची कथा त्यांच्या कथेची नक्कल आहे. अर्थात हा दावा ‘झुंड’च्या निर्मात्यांनी फेटाळून लावला. परिणामी हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. अन् न्यायालयानं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती.

मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे.या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत.

अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं ‘झुंड’बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे.

हेही वाचा-मौजे सोगाव पश्चिम येथील अतिक्रमित जुना पंढरपूर रस्त्याने घेतला मोकळा श्वास; ग्रामस्थांतून समाधान

माढा तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयांस आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांचेकडुन वीस लाख 70 हजार किंमतीचे ग्रंथ वाटप

हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट बेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

litsbros

Comment here