करमाळाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

..म्हणून नागपूरच्या रेशीमबागेत होणार वक्ते जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान रद्द

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

..म्हणून नागपूरच्या रेशीमबागेत होणार वक्ते जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान रद्द

नागपूर(प्रतिनिधी) ; भीमा कोरेगाव शौर्यदिनी म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी नागपूर येथील प्रसिद्ध रेशीमबाग मैदानावर भीमा कोरेगाव युद्धातील शूरवीरांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती रेशीमबाग मैदानात उभारली जाणार आहे. कोर्टाने अभिवादनास परवानगी दिली आहे.

यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओहोळ यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे ही आयोजन संविधान रक्षक दल व समविचारी संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. वाढता ओमीक्रोन आजाराचा धोका, व व्याख्यानासाठी होणारी गर्दी ही बाब लक्षात घेत कोर्टाने व्याख्यानाची परवानगी नाकारली आहे. वक्ते जगदीश ओहोळ हे करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे रहिवासी आहेत.

 

या कार्यक्रमावर आक्षेप घेत विशेष शाखेचे पोलीस आयुक्त यांनी कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. त्या निर्णयाविरोधात आयोजक संविधान रक्षक दलाचे प्रमुख प्रफुल्ल शेंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने विजयस्तंभ उभारून त्यास अभिवादानास सशर्त परवानगी दिली.

त्यामुळे यावर्षी रेशीमबागेत व्याख्यान व इतर भीमगीतांचे कार्यक्रम न घेता भीमा कोरेगाव शूरवीरांच्या विजयस्तंभास मानवंदना देणाचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी बोलताना प्रफुल्ल शेंडे म्हणाले की, संविधानावर व न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. अभिवादनास नाकारलेली परवानगी अखेर कोर्टाच्या आदेशाने मिळाली हा आमचा संविधानिक विजय आहे. भविष्यात लवकरच याच मैदानावर आम्ही वक्ते जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान व इतर कार्यक्रमांचे आयोजन करू.

litsbros

Comment here