महाराष्ट्र

अहमदनगर येथे रयत क्रांती संघटनेची बैठक संपन्न; नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अहमदनगर येथे रयत क्रांती संघटनेची बैठक संपन्न; नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

करमाळा(प्रतिनिधी) ; अहमदनगर येथील विश्रामगृहात रयत क्रांती संघटनेची बैठक पार पडली. यावेळी पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. या निवडी रयतक्रांती संघटना राज्य कार्यकारीणी सदस्य व नगर जिल्हा संपर्क प्रमुख अजय बागल यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते रवींद्र तरटे यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी गागरे चंद्रकांत सखाहारी नगर उत्तर जिल्हा युवक उपाध्यक्षपदी योगेश गोरखनाथ करपे नगर जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब रामदास मांडे यांची तर श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी संतोष पोपट ढगे माजी सैनिक तसेच श्रीगोंदा तालुका युवक अध्यक्षपदी मच्छिंद्र रावसाहेब जठार यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळेस दिनेश संभाजी शिंदे सिताराम दिनकर जाधव माऊली आव्हाड अमोल जालिंदर गायकवाड शिवशंकर जगदाळे सर माऊली झोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषण भाऊसाहेब मांडे साहेबांनी केले मार्गदर्शन ज्येष्ठ नेते रवींद्र भाऊ तरटे व रयत क्रांती राज्य कार्यकारीणी सदस्य अजय बागल यांनी केले .तर आभार शिवशंकर जगदाळे सर यांनी मानले.

litsbros

Comment here