मुली व महिलांची सुरक्षा करणे आपली जबाबदारी – ए.पी.आय नेताजी बंडगर उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात गेस्ट लेक्चरचे आयोजन

मुली व महिलांची सुरक्षा करणे आपली जबाबदारी – ए.पी.आय नेताजी बंडगर

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात गेस्ट लेक्चरचे आयोजन

माढा प्रतिनिधी – माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील 
श्री नंदिकेश्वर विद्यालय  येथे अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत “मुली,महिला यांची सुरक्षा व आपली जबाबदारी” या विषयावर माढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) नेताजी बंडगर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.


विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना बंडगर साहेबांनी मुली व महिलांच्या सुरक्षे विषयींच्या विविध कायद्यांची माहिती दिली. विद्यालयाच्या फलकावर पोलीस काका,पोलीस दीदी यांचे मोबाईल क्रमांक लावण्याविषयी सांगितले. तक्रार पेटीतील तक्रारींची आठवड्यातून दोन वेळा पाहणी केली जाईल तसेच शाळा भरण्यापूर्वी शाळा सुटल्यानंतर नियमित पेट्रोलिंग करणार असल्याचे सांगितले.विद्यालयातील मुलींशी संवादही साधला.

हेही वाचा – सापटणे भोसे येथील सुषमा हनुमंत राऊत हिची जलसंपदा विभाग कॅनॉल निरीक्षक (INSPECTOR) पदी निवड

हिसरे येथील शेतकऱ्याच्या लेकीचे यश; भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत निवड

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ देशमुख,माढा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संजय घोळवे व सचिन काशिद,दैनिक सकाळचे पत्रकार गणेश गुंड सर,विद्यालयाचे गुरुकुल विभागप्रमुख शब्बीर तांबोळी सर,ज्येष्ठ शिक्षिका सुनिता बिडवे मॅडम यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयातील विद्यार्थी आदी उपस्थित होते. शब्बीर तांबोळी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line